५ एप्रिल या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे ‘मी सावरकर’ कार्यक्रम !

( सौजन्य: हिंदुस्थान पोस्ट )

मुंबई – सर्वसामान्य जनतेला वीर सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, त्यांचा इतिहास आणि त्यांचे विचार यांविषयी माहिती देण्यासाठी ५ एप्रिल या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे ‘मी सावरकर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते कवित्व… जाज्वल्य हिंदुत्वाचे तेजस्वी विचारमंथन ‘मी सावरकर’’ असे या कार्यक्रमाचे वर्णन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार आहेत. भाजपचे आमदार अधिवक्ता आशिष शेलार हे कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत, तर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, श्रीधर फडके यांची सन्माननीय उपस्थिती असेल, तसेच डॉ. संजय उपाध्ये आणि शरद पोंक्षे यांसह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.

‘मी सावरकर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे करतील, तर संगीत संयोजनाचे दायित्व प्रशांत लळीत यांच्यावर आहे. कार्यक्रमाचे संयोजन ‘मेरक इव्हेंट्स’ने केले आहे. भरत बलवल्ली, नंदेश उमप, अजित परब, वैशाली सामंत, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या गायकांचाही कार्यक्रमात सहभाग आहे.

कार्यक्रम : मी सावरकर

प्रवेश : विनामूल्य प्रवेशिका सावरकर स्मारक येथे उपलब्ध

दिनांक : ५ एप्रिल २०२३, सायंकाळी ६ वाजता

स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर