बैठक संप्रदायाचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १६ एप्रिल या दिवशी मुंबईला येणार आहेत. या वेळी त्यांच्या हस्ते बैठक संप्रदायाचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

राज्यात पुढील ५ दिवस अवेळी पावसाची शक्यता !

१३ ते १५ एप्रिल या कालावधीत काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह गारपीटही होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जाज्वल्य राष्ट्रप्रेम लवकरच महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोचणार !

महाराष्ट्रातील घराघरात लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची महती पोचवण्याचा स्तुत्य निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यासाठी राज्यशासन लवकरच ‘हर घर सावरकर’ अभियान हाती घेणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ एप्रिलला रात्री लक्ष्मणपुरी येथील शासकीय निवासस्थानी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सदिच्छा भेट घेतली.

राज्यातील १६ मुख्य बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे व्यवस्थापकीय संचालकांनापुढे सादर !

‘स्वच्छतामोहीम हाती घेऊन ४ मास झाले, तरी बसस्थानकांवर इतकी अस्वच्छता असेल, तर राज्यात बसस्थानक स्वच्छता मोहीम खरोखरच राबवली जात आहे का ?’ याविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

अवेळी पावसामुळे राज्यात शेती आणि फळपिके यांची मोठ्या प्रमाणात हानी !

राज्यात सलग दुसर्‍या दिवशी अवेळी पावसामुळे शेतीपिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, सांगली, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पाऊस पडला. अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडल्यामुळे घरांचीही हानी झाली.

मुंबईत ३ आतंकवादी शिरल्याचा मुंबई पोलिसांना दूरभाष !

दुबईवरून ७ एप्रिलला पहाटे ३ आतंकवादी मुंबईत शिरल्याची आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याची माहिती संपर्क करणार्‍याने दिली आहे.

निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करण्यासाठी राज्यशासन सकारात्मक ! – राजपत्रित अधिकारी महासंघ

महाराष्ट्रातील शासकीय सेवेतील कर्मचार्‍यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करावी, यासाठी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक झाली.

मुंबई, ठाणे, रायगड येथे हनुमान जयंतीनिमित्त गदापूजन !

हनुमान जयंतीनिमित्त मुंबईत घाटकोपर, चेंबूर, गोरेगाव आणि नवी मुंबईत सानपाडा आणि आंग्रोळी गाव येथे गदा पूजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात वावे येथे, तर ठाण्यामध्ये पिंपळपाडा आणि नालासोपारा येथे गदापूजन करण्यात आले.

२० कोटी किमतीचे १ सहस्र ९७० ग्रॅम कोकेन जप्त !

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी ५ एप्रिल या दिवशी मुंबई विमानतळावर अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा अपप्रकार उघड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आफ्रिकी व्यक्तीसह एकूण तिघांना अटक केली आहे.