आर्यन खान याच्या जामिनावर २७ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी होणार !

अमली पदार्थविरोधी पथकाच्या ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील कारवाईच्या प्रकरणात २६ ऑक्टोबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी आरोपींच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली.

न्यायदानाची प्रक्रिया गतीमान करण्याची आवश्यकता ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

न्यायदान प्रक्रियेच्या विलंबात सर्वसामान्य माणूस पिचला जातो. न्यायालयात चकरा मारून त्याचे आयुष्य संपते आणि न्यायालयीन व्ययही परवडत नाही. त्यामुळे न्यायदानाची प्रक्रिया गतीमान करण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर २ आठवड्यांत उत्तर द्या !

जुलै २०२० मध्ये तेलतुंबडे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अन्वेषण यंत्रणेने केलेले सर्व आरोप तेलतुंबडे यांनी फेटाळले आहेत.

अमली पदार्थविरोधी पथक पोचले अभिनेते शाहरूख खान यांच्या निवासस्थानी !

अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी २१ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान यांच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ या निवासस्थानी पोचले. याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांकडून ‘शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेविषयीच्या कागदपत्रांची पूर्तता..

आर्यन खान याच्यासह तिघांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ‘कॉर्डेलिया क्रूझ’वर धाड टाकल्यानंतर केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने या सर्वांना अटक केली होती.

मंदाकिनी खडसे यांना तूर्तास अटक न करण्याचे न्यायालयाचे निर्देश

भोसरी येथील भूमी गैरव्यवहार प्रकरणी खडसे कुटुंबियांविरोधात ईडीने आरोपपत्र प्रविष्ट केले. खटल्याला अनुपस्थित राहिल्याने पी.एम्.एल्.ए. न्यायालयाने मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले…

शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला !

आरोपी आनंद अडसूळ सध्या रुग्णालयात आहेत.

मुंबईला तिसर्‍या लाटेचा धोका नाही !

मुंबई महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा

मुंबई उच्च न्यायालयात कोपर्डी खटल्याची सुनावणी न करण्याच्या न्यायाधिशांच्या शेर्‍यामुळे सुनावणी स्थगित !

१३ जुलै २०१६ या दिवशी कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली. घटनेचे गांभीर्य पाहून या खटल्याचे वेगाने अन्वेषण करण्यात आले आणि खटलाही चालवण्यास घेण्यात आला.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना २३ डिसेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी समन्स !

त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी किरीट सोमय्या यांना न्यायालयात उपस्थित रहावे लागणार आहे.