मुंबई – परिवहनमंत्री अनिल परब यांनी केलेल्या मानहानीच्या खटल्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना २३ डिसेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी समन्स पाठवले आहे. किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप केला आहे. या प्रकरणी अनिल परब हे सोमय्या यांच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी किरीट सोमय्या यांना न्यायालयात उपस्थित रहावे लागणार आहे.