भिवंडी तालुक्यातील आधुनिक वैद्या (कु.) पौर्णिमा पाटील यांनी बी.एच्.एम्.एस्. परीक्षेत मिळवले सुयश !

घरची परिस्थिती, वडिलांचे आजारपण यांसारख्या असंख्य अडचणींवर मात करत त्या उत्तीर्ण झाल्या आहेत.

आनंदनगर (ठाणे) येथील कोरोनावरील लसीकरण केंद्रावरील उत्तम व्यवस्थेचे अनुकरणीय उदाहरण !

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आनंदनगर येथे महापौर नरेश म्हस्के यांच्या प्रभागामध्ये ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी कोरोनावरील लस देण्यासाठी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मी आणि अन्य एक साधिका कोरोनाची लस घेण्यासाठी या केंद्रावर गेलो होतो.

समाजहिताचा शत्रू : स्वार्थांधता !

आपले कर्तव्य जाणून ते बजावत असणार्‍यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वच आधुनिक वैद्यांनी कोरोनाशी दोन हात करण्यास कंबर कसली पाहिजे. स्वार्थांधता हा समाजहिताच्या आड येणारा मोठा शत्रू आहे, हे आधुनिक वैद्यांनी लक्षात घ्यायला हवे !

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार !

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ मेच्या रात्री शहरातील २ रुग्णालयांतील ३ आरोग्य कर्मचार्‍यांना रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करतांना अटक केली. या वेळी त्यांच्याकडून १६ इंजेक्शन, ७ सहस्र रुपये रोख, ३ भ्रमणभाष आणि २ दुचाकी वाहने, असा एकूण २ लाख ५४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणार्‍या आधुनिक वैद्यासह दोघांना अटक

आधुनिक वैद्य प्रणव खैरे हा कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन २३ सहस्र रुपयांना विकत असे. प्रणव हा वैद्यकीय शिक्षण घेत असून एका खासगी रुग्णालयात आधुनिक वैद्य म्हणून काम करत आहे.

राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचा गोवा शासनाचा दावा; मात्र गोमेकॉतील रुग्ण ऑक्सिजनअभावी अत्यवस्थ !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिदिन पहाटे ३ वाजता ऑक्सिजनचा तीव्र तुटवडा भासत आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना रात्री मरणासन्न अवस्थेला सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

 ‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव ठेवण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे.

चंद्रपूर येथे आधुनिक वैद्य आणि जिल्हा प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाबाधित तरुणाचा तडफडून मृत्यू !

६ मेपासून ‘कोविड ऑनलाईन मॅनेजमेंट पोर्टल’ या ‘पोर्टल’वर नोंदणी केलेले कोरोनाबाधित रुग्ण उमेश चिमूरकर (वय ४२ वर्षे) यांना ७ मे या दिवशी ६ घंटेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात खाट उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा रुग्णालयातच तडफडून मृत्यू झाला.

कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी नागपूर येथील आधुनिक वैद्या अपूर्वा मंगलगिरी यांनी स्वतःचा विवाह मोडला !

कोरोनाच्या संकटात नियमांचे उल्लंघन करून अनेकांनी विवाह केले; मात्र आधुनिक वैद्या अपूर्वा यांनी कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी स्वतःचा विवाह मोडला, यावरून त्यांच्यातील समाजबांधिलकी दिसून येते. यातून इतरांनी बोध घ्यावा !

नागपूर येथे फळ विक्रेत्याने बनावट आधुनिक वैद्य बनून कोविड रुग्णांवर केले उपचार !

पूर्वी फळे आणि आईस्क्रीम यांची विक्री करणारा चंदन चौधरी याने कोरोना संकटाच्या काळात स्वतःला आधुनिक वैद्य असल्याचे खोटे भासवून रुग्णालय चालू केले. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.