‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव ठेवण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे. याचसमवेत लेखात उल्लेख केलेली रुग्णालये आणि आधुनिक वैद्य यांची नावे छापण्यामागे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी अन् जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे.’ – संपादक
एका शहरातील दोन धर्मप्रेमींना शासकीय कोविड सेंटरविषयी आलेला कटू अनुभव
कोविड सेंटरच्या अधिकार्यांनी रुग्णाला अहवालाविषयी सांगणे आणि त्यांनी १० दिवस रुग्णाकडे कोणताही पाठपुरावा न करणे वा काळजी घेण्याविषयी काहीही न सांगणे
सध्या बाहेरच्या राज्यात वा अन्य जिल्ह्यात प्रवासाला जाण्यापूर्वी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी आवश्यक असते. त्यामुळे एका शहरातील महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये २ जणांनी कोरोनाची चाचणी केली. त्या वेळी त्या दोघांना २ दिवसांत अहवाल मिळेल, असे सांगितले; पण प्रत्यक्षात तो अहवाल मिळण्याऐवजी तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी भ्रमणभाष करून अहवाल ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आल्याचे कळवले.
असे असतांना त्या अधिकार्यांनी संसर्ग झालेल्या व्यक्तींनाच ‘तुम्ही अहवाल आणि औषधे घेऊन जा’, असे सांगितले. तसेच प्रत्यक्षात ज्या दिवशी अहवाल मिळणार होता, त्या दिवशी सुट्टी असल्याने अहवाल मिळणार नसल्याने त्यांनी ‘दुसर्या दिवशी अहवाल घेऊन जा’, असे सांगितले. या वेळी संबंधित अधिकार्यांनी अन्य कोणतीही विचारपूस केली नाही. तसेच १० दिवस उलटल्यानंतरही शासकीय कोविड सेंटरमधून पाठपुराव्यासाठी पुन्हा संपर्क करण्यात आला नाही, तसेच कोणतीही काळजी घेण्याविषयी सांगण्यात आले नाही.
शासकीय केंद्रामध्ये सामाजिक अंतर पाळले न जाणे
आम्ही ज्या शासकीय केंद्रामध्ये चाचणी केली, तेथे कोणतेही सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे निदर्शनास आले. या केंद्रामध्ये एका दिवसात अनुमाने १५० रुग्णांची चाचणी घेतली जाते. – धर्मप्रेमी
एका तालुक्यातील एका धर्मप्रेमींना रेमडेसिविरसाठी ५ सहस्र रुपये द्यावे लागणे !
आमच्या एका नातेवाईक रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. रुग्णाची चाचणी केल्यानंतर तिचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आला. त्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले. त्यांना आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नव्हते. रुग्णालयात त्याचा साठा संपलेला होता. रुग्ण वयस्कर असल्याने त्यांना इंजेक्शन देणे तातडीचे होते. त्यामुळे त्यांना ते बाहेरून मागवावे लागले. त्यासाठी ५ सहस्र रुपये द्यावे लागले. त्यानंतर २ दिवसांनी इंजेक्शनचा साठा रुग्णालयात आला. – एक धर्मप्रेमी
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : [email protected] |