भिवंडी तालुक्यातील आधुनिक वैद्या (कु.) पौर्णिमा पाटील यांनी बी.एच्.एम्.एस्. परीक्षेत मिळवले सुयश !

आधुनिक वैद्या (कु.) पौर्णिमा अंकुश पाटील

ठाणे – भिवंडी तालुक्यातील मौजे केवणी गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आधुनिक वैद्या (कु.) पौर्णिमा अंकुश पाटील यांनी जिद्दीने, तसेच त्यांच्या वडिलांचे स्वप्न साकार करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बी.एच्.एम्.एस्. परीक्षेत सुयश मिळवले आहे. संगमनेर येथील एम्.एच्.एफ्.एस्. होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय येथून त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. घरची परिस्थिती, वडिलांचे आजारपण यांसारख्या असंख्य अडचणींवर मात करत त्या येथपर्यंत पोचल्या. तालुक्यातील मौजे केवणी या छोट्याशा गावात त्या आधुनिक वैद्य झाल्याचा सर्व ग्रामस्थ आणि पाटील यांचे कुटुंबीय यांनी सार्थ अभिमान वाटत असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशासाठी त्यांची आई कुंदा अंकुश पाटील, भाऊ मयूर पाटील आणि विशाल पाटील, तसेच सर्व कुटुंबियांचे त्यांनी आभार मानले आहेत.

‘जर त्यांनी मला साथ दिली नसती, तर मी आज आधुनिक वैद्य झाले नसते आणि वडिलांचे स्वप्न साकार करू शकले नसते. माझे यश हीच माझ्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे’, असे आधुनिक वैद्या कु. पौर्णिमा पाटील यांनी सांगितले.