शिवोपासनेची वैशिष्ट्ये आणि शास्त्र

शिवालयात असणारा नंदी हे शिवाचे वाहन आहे. शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घ्यावे. नंदीचे दर्शन घेतल्याने सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. यामुळे नंतर पिंडीचे दर्शन घेतांना, भक्ताला शिवाकडून येणार्‍या शक्तीशाली लहरी पेलण्याची क्षमता प्राप्त होते.

शिवाचे कार्य

जीव तपसाधनेने अग्नितत्त्व, यम, वरुण आणि वायुतत्त्व यांना ओलांडून मृत्युंजय अशा शिवतत्त्वाजवळ येतो. त्या वेळी शिव त्या जिवाला अभय देऊन र्ईश्‍वरी तत्त्वाच्या स्वाधीन करतो. त्या वेळी जीव आणि शिव एक होतात.

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

हिंदूंनो, शिवाच्या उपासनेविषयी धर्मशिक्षण जाणून घ्या !

शिवाच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र यांविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे, ही शिवभक्तांसाठी काळानुसार समष्टी साधना आहे.  

समर्थभक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवपंचायतन यज्ञ पार पडला !

समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने ब्राह्मणपुरी येथील काशीविश्‍वेश्‍वर देवालय येथे शिवपंचायतन यज्ञ पार पडला.

कु. रजनीगंधा कुर्‍हे यांना शिवासंदर्भात भजन ऐकतांना भगवान शिवाच्या तिसर्‍या नेत्रासंदर्भात आलेली अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे

‘भगवान शिवाचे तिसरे नेत्र म्हणजे संपूर्ण विश्‍वाला सामावून घेणारे स्थान असून यायोगेे शिव भूत, भविष्य आणि वर्तमान या सर्व काळांचे ज्ञान ठेवू शकतो’, असे वाटले.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचा नामजप का करावा ?

महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १,००० पटीने  कार्यरत  असते. त्याचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप अधिकाधिक आणि भावपूर्ण करावा.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : महाशिवरात्र

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० मार्चला दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

परळी (बीड) येथील वैद्यनाथ महाशिवरात्री महोत्सव रहित !

कोरोनाच्या संसर्गामुळे येथील बारा ज्योतिर्लिंगांतील एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री महोत्सव रहित करण्यात आला असून ८ ते १६ मार्च या कालावधीत वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातील सर्व शिवालये भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत.