मुंबई शहरामध्ये वाढणारे बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांचे वाढते अतिक्रमण
मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता .) – मुंबईमध्ये भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर आहे. त्याच्या लगत असलेल्या भिंतींजवळ अनेक अतिक्रमणांतून इमारती उभ्या राहिल्या आहेत; पण त्यांवर कारवाई करण्याची कुणाचेही धाडस नाही. तेथील महापालिकेचे अधिकारी हर्षद काळे यांच्या माध्यमांतून हे अतिक्रमण वाढत आहेत. उद्या चुकून तिथे कुणी कांडी टाकली, तर विधानसभेसह आपण नष्ट होऊन जाऊ. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, याकडे सरकारने लक्ष घातले पाहिजे, असे विधान भाजपचे सदस्य नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ फेब्रुवारी या दिवशी ते बोलत होते.
आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलेली सूत्रे !
१. मुंबईतील हिंदूंना ‘दाऊद’ची धमकी
मशीद बंदर परिसरामध्ये ‘लक्ष्मी भवानी’ नावाची ४ मजली इमारत होती. आता तेथे १३ मजली इमारत उभी राहिली आहे. त्या इमारतींतील मूळ मालकांना ‘इमारत दुरुस्ती’च्या नावाखाली तेथून हाकलून लावले आहे. त्या इमारतीमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान रहात आहेत. हिंदू तेथे काही विचारायला गेल्यास दाऊदच्या नावाने धमकी दिली जाते.
२. अनाधिकृत इमारतींना महापालिकेकडून अभय
‘लक्ष्मी भवन’ इमारतीत रहाणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. ते कोठून आले ? त्यांना कुणी आणले ? त्यांची नोंद ना पोलिसांकडे आहे, ना महापालिकेकडे आहे, ना म्हाडाकडे, असा भोंगळ कारभार होत आहे. असे असले, तरी त्यांना महापालिकेकडून सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात येत आहेत.
३. ‘लँड जिहाद’च्या माध्यमातून सरकारी भूमींवर अतिक्रमण !
मुंबईतील प्रत्येक प्रभागांमध्ये ‘लँड जिहाद’च्या नावाने अतिक्रमण होत आहे. सरकारच्या भूमींवर इमारती बांधल्या जात आहेत. धार्मिक स्थळे बांधली जात आहेत. केवळ तिथे येऊन हिरवी चादर टाकून द्यायची की, लगेच इमारत उभी रहाते, ही परिस्थिती भयानक आहे. कुणाची अनुमती घेतात, याचा काही थांगपत्ता नाही. कुठे म्हाडाच्या भूमी आहेत, तर काही ठिकाणी मुंबई महापालिकेच्या भूमी आहेत.
४. धारावीमध्ये पोलिसांच्या जागेवर मदरसा !
धारावीमध्ये पोलीस विभागाच्या भूमीवर ४ मजली मदरसा उभा केला आहे. त्याला कोणत्याही प्रशासनाची अनुमती नाही. हे केवळ अतिक्रमणच आहे. याविषयी विचारायला गेलेल्या स्थानिकांच्या घरात घुसून ज्येष्ठ महिला, लहान मुले-मुली यांना मारहाण करण्यात आली. लोखंडी सळईने ही मारहाण केली होती.
५. त्यांना हिंदूंचा टक्का अल्प करायचा आहे !
बहुसंख्य हिंदु समाजाचा टक्का अितक्रमणाच्या नावाखाली अल्प करता येईल, असा प्रयत्न चालू आहे. राज्य सरकारने विचार करायला पाहिजे.
६. बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांचे अतिक्रमण !
गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर येथे म्हाडाच्या भूमीवर धार्मिक स्थळ उभारले जात आहे. सरकारी भूमीवर धार्मिक स्थळ कसे उभारले जाते ? मोठी मशीदही तेथे उभी राहिली आहे. बाजूला लग्नाचे सभागृह बांधले जाते. हक्काच्या भूमी लाटल्या जात आहेत.