Land Jihad Waqf Board : सोलापूर आणि मालेगाव येथे वक्फ बोर्डाकडून भूमी जिहाद ! – आमदार गोपीचंद पडळकर

हिंदूंना घरे सोडून जाण्यास बाध्य केले जात असल्याचा आरोप !

श्री. यज्ञेश सावंत, मुंबई

आमदार श्री. गोपीचंद पडळकर

मुंबई – सोलापूर महानगरपालिका हद्दीतील साखरपेठ परिसरात सिटी सर्व्हे क्रमांक ९९/८० येथे दीडशे वर्षांपासून मोठ्या संख्येने हिंदू रहात आहेत. या ठिकाणी वक्फ बोर्डाकडून स्थानिकांना वारंवार नोटिसा देऊन भूमी बळकावण्याचा प्रयत्न होत आहे. या विरोधात स्थानिकांनी अनेक मोर्चे काढले. येथील रहिवासी महापालिकेत अनेक वर्षांपासून कर भरतात. त्यांच्याकडे ‘प्रॉपर्टी कार्ड’ही आहे, तरी अद्याप ७/१२ वर लोकांची नावे लागू शकलेली नाहीत. ‘एका विशिष्ट समाजा’चे लोक या लोकांना वारंवार त्रास देऊन त्यांना घर सोडून जाण्यासाठी भाग पाडत आहेत. त्यांना घर सोडून जाण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केली.

आमदार पडळकर पुढे म्हणाले की, सोलापूर येथे साखरपेठ हद्दीत ‘हाशी मकीर मशीद ट्रस्ट’ स्थापन झाले आहे. जाकीर जहांगीर मणियार आणि अहमद कलामसाब सैय्यद हे त्याचे विश्‍वस्त आहेत. तेे परिवहन विभागात नोकरी करतात. जर ते सरकारी नोकरीत असतील, तर त्यांना न्यासावर रहाण्याचा अधिकार नाही. या न्यासाची माहिती घेतली, तेव्हा त्याची नोंद धर्मादाय विभागाकडेही नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा गंभीर विषय आहे. प्रशासनाने याविषयी कारवाई करावी आणि या रहिवाशांना न्याय द्यावा, अशी सरकारकडे मी मागणी करतो. असाच प्रकार येथील अन्य एका जागेविषयीही झाला आहे. त्याकडेही सरकारने लक्ष द्यावे.

मालेगाव येथे भूमी जिहाद !

आमदार पडळकर पुढे म्हणाले की, मालेगाव येथेही भूमी जिहाद विषय जोरात चालू आहे. दसाने, मौजे धाणे, चिखल आहोळ आणि वडगाव या गावांत खोट्या पद्धतीने भूमीचे दस्त करण्याचे अन् अयोग्य नोंदी करून कागदपत्रे सिद्ध करण्याचे प्रकार झाले आहेत. त्याविषयी मी सरकारला कागदपत्रे देऊ शकतो. या प्रकरणी सरकारने कारवाई करावी, अशी मी मागणी करतो.

संपादकीय भूमिका 

काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेला ‘वक्फ कायदा १९९५’ यासाठी कारणीभूत आहे. हिंदूंच्या आणि देशाच्या मुळावर उठलेला हा काळा कायदा रहित केल्याखेरीज धर्मांध मुसलमानांकडून चालवल्या जात असलेल्या प्रयत्नांना खिळ बसणार नाही, हे लक्षात घ्या !