राज ठाकरे यांनी खरी मर्दानगी दाखवली ! – कालीचरण महाराज

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरी मर्दानगी दाखवली आहे. भोंग्यांविषयीची राज ठाकरे यांची भूमिका योग्य असून त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले.

सोलापूर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ पोलिसांकडून जप्त !

जप्त करण्यासाठी आमच्याकडे शस्त्रे किंवा हत्यारे होती का ? पोलिसांनी सूडबुद्धीने आमचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ जप्त केले आहेत. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असतो.

पुण्यातील पुण्येश्वर मंदिरातच महाआरती करण्यावर मनसे ठाम !

मंदिराला लागून छोटा शेख सल्ला मशीद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला; मात्र पुणे पोलिसांनी अद्याप अनुमती दिली नाही.

पनवेल येथे सकाळी मशिदींमधून बांग देण्यात आली नाही !

मनसेचे शहराध्यक्ष योगेश चिले यांनी एका व्हिडिओद्वारे सकाळी मशिदींमधून बांग देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. प्रतिदिन पनवेलमध्ये पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी आणि ६ वाजून ८ मिनिटांनी अजान भोंग्यावरून दिली जायची

मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली पोलिसांना तुरी !

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना कह्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी पलायन केले. या वेळी त्यांच्यासमवेत मनसेचे कार्यकर्ते संतोष धुरी हेही होते.

धुळे येथे मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक !

येथील मनसेच्या वतीने मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात विविध भागांत आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत शहराच्या विविध भागांत निदर्शने केली.

राज ठाकरे यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा नोंद !

१ मे या दिवशी येथे झालेल्या सभेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ११६, ११७ आणि १५३ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. या खटल्यात त्यांना जामीन मिळू शकतो

‘आवाजी’ अत्याचाराचे पाठीराखे !

सर्वत्रचे अनधिकृत भोंगे हटवणे, हाच या समस्येवरील रामबाण उपाय आहे; पण पोलीस या भोंग्यांवर कदापि कारवाई करणार नाहीत, उलट पोलिसांचे हिंदूंच्या विरोधातील कारवाईरूपी भोंगे नित्यनेमाने वाजत रहातील ! खरे तर हेही भोंगे बंद होण्याची आवश्यकता आहे !

मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यांवर आंदोलन करण्यासारखी परिस्थिती नाही ! – खासदार संजय राऊत

सर्वांनी अनुमती घेतली असल्याने कारवाईची आवश्यकता नाही. हाच नियम मंदिर, चर्च आदी सर्वांना लागू आहे, असे विधान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मशिदींसमोर मनसेच्या वतीने हनुमान चालिसाचे पठण !

मनसेच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईची पोलिसांची तत्परता मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याच्या संदर्भात कुठे जाते ?