भोंगे जप्त !
धुळे – येथील मनसेच्या वतीने मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात विविध भागांत आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत शहराच्या विविध भागांत निदर्शने केली. या वेळी कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावण्यासाठी भोंगे हातात घेतले होते. पोलिसांनी मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांना कह्यात घेऊन त्यांच्याकडील भोंगे जप्त केले. या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘मनसेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे’, असा आरोप केला. या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी ‘जय श्रीराम, जय हनुमान’ अशा घोषणा दिल्या. आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत ‘ही अटक हिंदूंचा आवाज दाबला जावा, यासाठी असली, तरी आम्ही हे सहन करणार नाही’, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.