विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनिमयाशी अनुरूप नियुक्त्यांचे विधेयक विधानसभेत संमत !

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक १९ डिसेंबर या दिवशी संमत करण्यात आले.

नियुक्ती नसतांनाही राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानांची सजावट !

राज्यात अद्याप एकाही राज्यमंत्र्यांची नियुक्ती झाली नाही, असे असतांना विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी राज्यमंत्र्यांच्या निवासाची सजावट करण्यात आली आहे.

नागपूर येथे विधानभवनावर धडकणार लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ !

विधानभवनावर धडकणार ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ ! मोर्च्याद्वारे हिंदूंचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येकाने ‘आता नाही, तर कधीच नाही’ हा निर्धार करून अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोचण्याचा निर्धार केला आहे.

शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेण्याची पात्रता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबियांची नाही ! – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा घणाघात

शरद पवार यांनी ४ वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगले, त्यानंतर त्यांचाच पुतण्या या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आणि अर्थमंत्री होत आहे. त्यांचीच मुलगी परत खासदार होते. त्यांचाच नातू परत आमदार होतो.

शिवसेनेच्या मूळ कार्यालयाची जागा शिंदे गटाकडे, तर ठाकरे गटासाठी नवीन कार्यालय !

सध्या ‘शिवसेना’ हे नाव आणि पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ यांविषयीचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे; मात्र ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून ‘आपण मूळ शिवसेना’ असल्याचा दावा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरण भारताच्या कायदेतज्ञांकडे पाठवले आहे ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

काही दिवसांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये हे प्रकरण केंद्रीय कायदेतंत्रांचा सल्ला घेण्यासाठी पाठवण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यपालाच्या कृतीवर आक्षेप घेणारे अशोक चव्हाण यांना सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी फटकारले !

राज्यपालांच्या हेतूविषयी सभागृहात प्रश्न उपस्थित करता येत नाही. ‘मुख्यमंत्रीपद भूषवले असतांनाही याविषयी माहिती कशी नाही ?’, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात अशोक चव्हाण यांना फटकारले.

विधीमंडळ परिसरात प्रथमच शाईपेनच्या वापरावर बंदी ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईने आक्रमण झाल्यानंतर राज्यभरात नेत्यांच्या बंदोबस्ताच्या वेळी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

नक्षलवाद्यांच्या धमकीच्या वेळी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याच्या धारिकेवर उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली नाही ! – शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्कमंत्री

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे आत्राम यांना सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी केली. त्यावर शंभूराज देसाई ही माहिती दिली.

आमदार सौ. सरोज अहिरे-वाघ स्वतःच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला उपस्थित !

बाळ माझ्याविना राहू शकत नाही; मात्र माझे कुटुंबीय माझ्यासमवेत आले असून ते बाळाची काळजी घेतील, तेव्हा मी मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडणार आहे; कारण हे प्रश्नही महत्त्वाचे असल्याने मला बाळाला घेऊन यावे लागले.