नक्षलवाद्यांच्या धमकीच्या वेळी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्याच्या धारिकेवर उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली नाही ! – शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्कमंत्री

शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्कमंत्री

नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – एकनाथ शिंदे नगरविकासमंत्री असतांना त्यांना आणि त्यांचे कुटुंबीय यांना नक्षलवाद्यांनी ठार मारण्याची धमकी दिली. त्या वेळी मी गृहराज्यमंत्री होतो. या वेळी बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेऊन ही धारिका स्वाक्षरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली; मात्र त्यावर स्वाक्षरी झाली नाही, असा गंभीर आरोप तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि सध्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे आत्राम यांना सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी केली. त्यावर शंभूराज देसाई यांनी वरील माहिती सभागृहात दिली.