नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – येथील विधानभवन परिसरात प्रथमच शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईने आक्रमण झाल्यानंतर राज्यभरात नेत्यांच्या बंदोबस्ताच्या वेळी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोणत्याही नेत्यांवर पुन्हा शाईफेक न होण्यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून विधानभवन परिसरात शाईच्या पेनवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी १९ डिसेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली.