नियुक्ती नसतांनाही राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानांची सजावट !

डावीकडून देवेंद्र फडणवीस आणि सुनील प्रभू

नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात अद्याप एकाही राज्यमंत्र्यांची नियुक्ती झाली नाही, असे असतांना विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी राज्यमंत्र्यांच्या निवासाची सजावट करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याविषयी १९ डिसेंबर या दिवशी सभागृहात हरकतीचे सूत्र उपस्थित केले. यावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही अधिवेशनाच्या काळातही मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकतो’, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे ‘अधिवेशनाच्या काळात मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे का ?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे.