नागपूर येथील विधीमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन !

अधिवेशनाच्या काळात आमदार सौ. सरोज अहिरे यांना त्यांच्या बाळाची काळजी घेता यावी, यासाठी नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष चालू करण्यात आला आहे.

विरोधकांच्या गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

शहरातील भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे, अशी माागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली. सत्ताधार्‍यांनी त्यांच्या विधानाला हरकत घेतली, याला विरोधकांनी आक्षेप घेतला. यातून सत्ताधारी आणि विरोधक यांनी गोंधळ घालण्यास प्रारंभ केला.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची गृहमंत्र्यांची विधानसभेत घोषणा !

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी याविषयीची लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या वेळी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणी विशेष पथक नेमून चौकशी करण्याची मागणी केली होती.

१ सहस्र ५०० लक्षवेधी सूचना, तर सहस्रावधी तारांकित प्रश्‍न प्रलंबित असतांना पहिल्या दिवशी प्रश्‍नोत्तरे न घेण्याची प्रथा हिवाळी अधिवेशनातही कायम !

जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी अधिकाधिक वेळ कामकाज करून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी जनहित कधी साधणार ?

विधानसभेच्या पायर्‍यांवर सत्ताधारी-विरोधक समोरासमोर आंदोलन !

हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी प्रथम विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात निदर्शने केली, तर त्याच ठिकाणी सत्ताधार्‍यांकडूनही आंदोलन करण्यात आले.

विधीमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली’ हे ‘अ‍ॅप’ उपलब्ध !

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ‘अ‍ॅप सिद्ध केले असून विधीमंडळ कामकाजाविषयी माहिती मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी या ‘अ‍ॅप’चा वापर करावा.

मुख्यमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीवरून विधान परिषदेत गदारोळ : कामकाज २ वेळा स्थगित

सभागृहात एकूणच गदारोळाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सभागृहाचे कामकाज २ वेळा प्रत्येकी १५ मिनिटांसाठी स्थगित केले.

तारांकित प्रश्नांच्या तासिकेत विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचे कामकाज २ वेळा स्थगित !

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तारांकित प्रश्नानंतर २ मिनिटे बोलण्यासाठी वेळ देण्याचे आश्वासन देऊनही विरोधकांनी घोषणाबाजी चालूच ठेवली. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.

विधानसभेच्या पायर्‍यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांचे समोरासमोर आंदोलन !

‘जो हिंदु हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा’ अशा घोषणा सत्ताधार्‍यांनी दिल्या.

मुंबईमध्ये ५ सहस्र ५०० आशासेविका करणार आरोग्यसेवांचे सर्वेक्षण ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘‘यापूर्वीच्या सरकारने आरोग्यसेवेकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुंबईतील रुग्णालयांची अशी स्थिती झाली आहे. आता मात्र हा प्रश्नाकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देऊ.