‘जैश-ए-महंमद’चा आतंकवादी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणार्‍या जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या रईस शेख (वय २८ वर्षे) याचा ताबा महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या नागपूर विभागाने घेतला आहे.

फुटीरतावादी यासिन मलिक, शब्बीर शाह आदींवर गुन्हा नोंदवा ! –  न्यायालयाचा आदेश  

या फुटीरतावाद्यांना आतापर्यंत कठोर शिक्षा होणे अपेक्षित असतांना आता कुठे त्यांच्यावर गुन्हे नोंद होणार असतील, तर ‘या प्रकरणांचा निकाल किती वर्षांनी लागेल आणि शिक्षा कधी होईल ?’, हा प्रश्‍नच आहे !

काश्मीरमध्ये ३ चकमकींमध्ये ४ आतंकवादी ठार; एका आतंकवाद्याला अटक

कितीही आतंकवादी ठार केले, तरी जोपर्यंत पाकला संपवण्यात येणार नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !

अजित डोवाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला पकडले !

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या येथील घरात एका अज्ञात तरुणाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या तरुणाने डोवाल यांच्या घरात चारचाकी गाडी घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला; मात्र येथील सुरक्षा कर्मचार्‍यांनी योग्य वेळी या व्यक्तीला थांबवून कह्यात घेतले.

अनंतनाग येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस हुतात्मा

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

काश्मीरच्या कुलगाममध्ये १ जिहादी आतंकवादी ठार, १ सैनिक हुतात्मा !

एकेका आतंकवाद्याला ठार करत बसलो, तर भारताच्या मुळाशी उठलेला जिहादी आतंकवाद कधीच संपुष्टात येणार नाही ! पाकिस्तानला नष्ट केल्याखेरीज आतंकवाद्यांचा नायनाट होणे कदापि शक्य नाही ! त्यामुळेच पाकिस्तानचे समूळ उच्चाटन करा !

जैश-ए-महंमद या संघटनेतील आतंकवाद्याच्या हस्तकाला कोणतेही स्थानिक साहाय्य मिळाले नाही ! – पोलीस आयुक्त

अधिक चौकशीसाठी नागपूर पोलीस आतंकवाद्यांचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख याला कह्यात घेणार!

नागपूर पोलिसांनी श्रीनगरला जाऊन आतंकवादी तरुणाची चौकशी केली !

नेमक्या कुठल्या भागांची रेकी केली, या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी नागपूर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे डिसेंबर २०२१ च्या शेवटी श्रीनगर येथे जाऊन आले आहेत.

संघ मुख्यालयाची रेकी केल्याचे प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवे ! – विरोधी पक्षनेते, विधानसभा

पाकिस्तानपुरस्कृत अतिरेकी संघटना ‘जैश-ए-महंमद’कडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करण्याचा प्रकार अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे.