बारामुल्ला येथे ३ पाकिस्तानी आतंकवादी ठार

एक पोलीस वीरगतीला प्राप्त

बारामुल्ला (जम्मू-काश्मीर) – येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या ३ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले. या वेळी एका पोलिसाला वीरगती प्राप्त झाली.

ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या जवळ शस्त्रसाठा मिळाला. यावर्षी आतापर्यंत २२ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे.