आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कह्यात !

मालमत्ता गैरमार्गाने कमावली नसल्याचे ९० दिवसांत सिद्ध करावे लागणार !

मुंबई – आयकर विभागाच्या ‘बेनामी प्रॉपर्टी सेल’च्या वतीने अजित पवार यांची एक सहस्र कोटींहून अधिक रकमेची संपत्ती कह्यात घेतली आहे. यामध्ये अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची ६०० कोटी रुपयांची मालमत्ता, दक्षिण देहलीतील २० कोटी रुपयांची मालमत्ता, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचे मुंबईस्थित २५ कोटी रुपयांचे कार्यालय, गोव्यातील २५० कोटी रुपयांचे ‘रिसॉर्ट’ (एक प्रकारचे उपहारगृह) आदी मालमत्तांचा समावेश आहे. यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या २७ भूमी कह्यात घेण्यात आल्या असून त्यांचे मूल्य अनुमाने ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ‘कह्यात घेतलेली ही मालमत्ता अजित पवार यांनी गैरमार्गाने कमावलेली नसल्याचे त्यांना ९० दिवसांत सिद्ध करावे लागणार आहे’, अशी नोटीस आयकर विभागाने त्यांना दिली आहे.