पाकमध्ये आतंकवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या आक्रमणात ३ पोलीस ठार

पेशावर (पाकिस्तान) – येथील सरबंद पोलीस ठाण्यावर ६ ते ८ आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ३ पोलीस ठार झाले. हे आतंकवादी १४ जानेवारीला पहाटे लहान बाँब आणि ‘स्नायपर’ बंदुक घेऊन अचानक पोलीस ठाण्यात घुसले. त्यांनी गोळीबार चालू केला. त्या वेळी पोलीस ठाण्यात अधिकार्‍यांसह १२ ते १४ पोलीस होते. गोळीबार करून सर्व आतंकवादी पळून गेले.