देवतांची चित्रे काढण्याचा आदेश देणार्‍या शिक्षणाधिकार्‍यांना समज दिली आहे ! – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन

मुंबई, १२ जानेवारी (वार्ता.) – शाळा आणि महाविद्यालये यांतील देवतांची चित्रे काढण्याचा आदेश देणारे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एम्.एस्. देसले यांना योग्य ती समज दिली आहे, अशी माहिती धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अन् वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

धुळे जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देसले यांनी ६ जानेवारी या दिवशी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये यांतील मुख्याध्यापकांना पत्र पाठवून शाळा-महाविद्यालये यांमध्ये सरस्वतीदेवीचे चित्र असल्यास ते काढण्याचा आदेश दिला होता. नाशिक येथील ‘अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे’चे अध्यक्ष पवन कोराटे यांनी केलेल्या मागणीचा संदर्भ देसले यांनी त्यांच्या आदेशात दिला होता. गिरीश महाजन यांनी समज दिल्यानंतर हा आदेश धुळे येथील शिक्षण विभागाकडून मागे घेण्यात आला आहे.