नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – फोन टॅपिंग प्रकरणात भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी रश्मी शुक्ला यांचा संबंध असल्याचे लक्षात असूनही यामागील सूत्रधार कोण, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी करत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी याविषयी विधानसभेत चर्चा करण्याची मागणी केली. अर्ध्या घंट्यांच्या चर्चेसाठी नियमानुसार १ घंटा आधी निवेदन दिले नसल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चर्चा नाकारली. यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
फोन टॅपिंग प्रकरणी विधानसभेत राडा, नाना पटोले भिडले, अजित पवार अध्यक्षांना नडले!https://t.co/bECDqrwWnY@NANA_PATOLE @AjitPawarSpeaks #vidhansabha #WinterSession #PhoneTapping
— Maharashtra Times (@mataonline) December 22, 2022
१. या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काँगेसचे आमदार नाना पटोले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार आशिष देशमुख, आमदार एकनाथ खडसे आदी अनेक राजकीय नेत्यांच्या प्रबळ कारण नसतांना ‘फोन टॅपिंग’ करण्यात आले.
२. यामागील सूत्रधाराचे नाव सभागृहापुढे यायला हवे, असे नमूद करत यावर चर्चा करण्याची मागणी केली.
३. या वेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही सदस्याचे अधिकार बाधित होत असेल, तर त्यांनी विशेषाधिकार समिती किंवा हक्कभंग समिती यांच्याकडे रितसर अर्ज करावा. आपणाला न्याय मिळवून देण्याचे काम मी करीन; मात्र सभागृहाचे कामकाज नियमानुसार करण्याचे आवाहन केले. या वेळी चर्चेला अनुमती नाकारल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.