राज्यातील ६ सहस्र ७४२ नर्सिंग होमकडून विविध वैद्यकीय नियमांचे उल्लंघन झाल्याने कारवाई ! – डॉ. अर्चना पाटील  

म्हैसाळ प्रकरणानंतर राज्यातील सर्वच वैद्यकीय आस्थापनांची तपासणी करण्याचे न्यायालयीन निर्देश देण्यात आले होते.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील ‘सीटी स्कॅन यंत्र’ बंद पडल्याने रुग्णांचे हाल !

मध्यवर्ती रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्र बंद पडल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

केईएम् रुग्णालयाचे ‘मेडिसीन युनिट’ जागेअभावी असुरक्षित !

औषधे आणि रसायने यांचा मोठा साठा असलेल्या केईएम् रुग्णालयाच्या मेडिसीन युनिटमध्ये क्षुल्लक कारणामुळे कधीही आगीचा भडका उडेल, अशी भयावह स्थिती आहे.

रुग्णाची पडताळणी न करताच औषध लिहून देणे हा गुन्हाच ! – उच्च न्यायालय

एखाद्या रुग्णाची पडताळणी न करताच त्याला औषध लिहून देणे हा गुन्हाच असल्याने एका आधुनिक वैद्य दांपत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

मुंबईत रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचे सरकारी रुग्णालयावर आक्रमण !

धारावीच्या राजीव गांधी नगर येथे राहणार्‍या सचिन जैस्वार या युवकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील रहिवासी यांनी २१ जुलैच्या रात्री शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयावर आक्रमण केले.

राज्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये खाटांचा तुटवडा

ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रति १ सहस्र रुग्णांमागे १ खाट असावी, असा जागतिक आरोग्य संघटनेचा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र राज्यातील ग्रामीण भागांतील रुग्णालयांमध्ये ४ सहस्र २६४ रुग्णांसाठी १ खाट आहे.

हरियाणामध्ये मृत झालेली व्यक्ती अंत्यसंस्काराआधी जिवंत झाली !

बुपनिया गावातील रहिवासी असलेल्या ८० वर्षीय राजमिस्त्री सुरते यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही वेळ त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले; मात्र त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सरकारी कारभाराचा कर्मचार्‍यांना फटका !

सातारा जिल्ह्यातील अनेक कर्मचार्‍यांना १२ जून या दिवशी मोठा धक्का बसला. कर्मचारी राज्य विमा निगम (ईएस्आय) या योजनेच्या माध्यमातून सहस्रो कर्मचार्‍यांना सहज उपचार घेता येत होते.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील अभ्यागत समिती विसर्जित करून नवीन समिती गठीत करावी ! – पतित पावन संघटनेची मागणी

रुग्णालयाकडील ‘अभ्यागत समिती’ विसर्जित करून नवीन समिती गठीत करावी, या मागणीचे निवेदन पतित पावन संघटनेने पालकमंत्री आणि प्रभारी मुख्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.

अशा कायद्यामुळे रुग्णालये अत्यवस्थ रुग्णांना दाखल करून घेणार नाहीत. अशाने उपचारामुळे जगू शकणारे रुग्ण मरतील त्याचे काय ?

‘रुग्णांकडून भरमसाठ देयक उकळणार्‍या खासगी रुग्णालयांवर नियंत्रण आणण्यासाठी देहली सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत.


Multi Language |Offline reading | PDF