नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील, तसेच कळवा (जिल्हा ठाणे) येथील शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यांतील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिली.