नवरात्र आणि दिवाळीत महागाई वाढण्याची चिन्हे; रुपयाचे अवमूल्यन !

मुंबई – येत्या काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. २२ सप्टेंबर या दिवशी शेअरबाजार चालू झाल्यावर भारतीय रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले. येणार्‍या काळात एका अमेरिकी डॉलरसाठी ८०.२८ रुपये मोजावे लागणार आहेत. रुपया घसरल्याने भारतातील अनेक गोष्टी येणार्‍या नवरात्र आणि दिवाळी या काळात महाग होण्याची चिन्हे आहेत.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.७५ टक्क्यांनी वाढ केली असून पुढील ३ मासांत आणखी व्याजदर वाढेल, असा अंदाज आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. भारतात पेट्रोल-डिझेलचे दर येत्या काळात वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नवरात्र-दिवळीला पेट्रोलचे दर वाढतील. याखेरीज काही डाळी आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू महाग होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.