पेट्रोल पंप बंदच्या अफवेमुळे चालकांनी वाहनांमध्ये इंधन पूर्ण भरले !

संभाजीनगर – ‘पेट्रोल पंप पुढील ३-४ दिवस बंद रहाणार आहे. त्यामुळे आताच पुरेसे पेट्रोल वाहनात भरून ठेवा’, असा व्हॉट्सॲप संदेश प्रसारित झाल्याने वाहनचालकांनी त्यावर विश्वास ठेवून वाहनांमध्ये पूर्ण क्षमतेने इंधन भरले. त्यामुळे काही पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला. तथापि पेट्रोल पंप बंद रहाणार नसून या निव्वळ अफवा आहेत, असे ‘पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन’चे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले. आस्थापनांकडून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा अनियमित होत असल्यामुळे त्याचा निषेध म्हणून डिलर्सनी केवळ १ दिवस इंधन खरेदी बंद ठेवली आहे. याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व ठिकाणी इंधन पुरवठा सुरळीत होत आहे आणि राहील, असेही त्यांनी सांगितले.