परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या ‘मग’मध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे आणि ‘त्या मगामधून सूक्ष्म नाद ऐकू येणे’, हे त्यांचे कार्य निर्गुण स्तरावर व्यापक होत असल्याचे निदर्शक !

‘उच्च कोटीच्या संतांनी हाताळलेल्या दैनंदिन उपयोगाच्या निर्जीव वस्तूही त्या संतांमधील सत्त्वगुणाने भारित होऊन पावन होतात. संतांनी हाताळलेल्या वस्तूंचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल.

‘आज ना उद्या देह सोडायचाच आहे’, या विचाराने वाईट शक्तींच्या या त्रासांतूनही शिकणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले एकदा मार्गदर्शनात मला म्हणाले, ‘‘त्रासाचे प्रमाण वाढतच चालले आहे; पण या त्रासांतूनही आपण काहीतरी शिकूया. ते मानवजातीला उपयोगी पडेल. मानवजात शिकली, तर चांगले आहे. आपल्याला काय आज ना उद्या देह सोडायचाच आहे.’’

मातृवात्सल्याने साधकांची काळजी घेणारे आणि प्रत्येक क्षणी साधकांचाच विचार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘भक्त देवाची सेवा करत नाहीत, तर देवच भक्तांची सेवा कशी करतो’, हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहवासात ठायी ठायी दिसून येते.

स्वसंघटनेच्या कक्षा भेदून हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करणारे अन् हिंदूसंघटनासाठी प्रयत्न करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांनीही आचार-विचारांतही साधक आणि हिंदुत्वनिष्ठ, स्वतःची आणि इतरांची संघटना असा भेद कधीच केला नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनाही ते साधकांप्रमाणे मार्गदर्शन करू शकले आणि आता बरेच हिंदुत्वनिष्ठ त्या मार्गाचे आचरण करून हिंदुत्वाच्या कार्यात आणि ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गात अग्रेसर झाले आहेत. याची काही उदाहरणे या लेखात दिली आहेत                  

सनातन-निर्मित शिवाच्या चित्रांमधील मुद्रांचा लक्षात आलेला भावार्थ आणि त्यांचे महत्त्व !

वायुतत्त्वाची मुद्रा, म्हणजेच ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा ही व्यष्टी साधनेसाठी, चिंतन करण्यासाठी किंवा ज्ञान मिळवण्यासाठी पूरक असल्याचे, तर आकाशतत्त्वाची मुद्रा ही समष्टी साधनेसाठी पूरक असल्याचे लक्षात येते.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

आत्पकाळामध्ये महायुद्ध, भूकंप, सुनामी यांप्रमाणेच उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. भविष्यात विविध कारणांनी उष्णतेची लाट आल्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत ? याची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ठाणे येथील संत पू. डॉ. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या कार्याविषयी व्यक्त केलेला विश्‍वास !

नृत्याचार्य पू. डॉ. राजकुमार केतकर म्हणाले, ‘‘सनातन संस्था सध्याच्या काळाच्या दृष्टीने पुष्कळ महत्त्वाचे कार्य करत आहे. रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहून आल्यावर ‘सनातन संस्थेविषयी प्रसारमाध्यमांनी जो अपप्रचार केला आहे, त्यात तीळमात्रही तथ्य नाही’, हे मला लोकांना सांगायचे आहे….

आमच्या गुरुमाऊलीचा जन्मोत्सव सोहळा ।

त्रैलोक्याचे नाथ बसले सिंहासनी ।
ब्रह्मांंडातील सारे जीव झाले हर्षभरित ॥ १ ॥
भक्तवत्सल, करुणाकर  अन् सुंदर मनमोहनाचे रूप ।
पाने आणि फुले आनंदली त्यांच्या चरणी जाण्यास ॥ २ ॥

इतर संतांचे भक्त आणि सनातनचे साधक

सनातनचे सहस्रो साधक मायेतील एकही प्रश्‍न विचारत नाहीत. ते प्रश्‍न विचारतात, तेही केवळ साधनेत पुढे जाण्यासंदर्भातील असतात.

दैनिक सनातन प्रभातचा परात्पर गुरु डॉक्टर आठवले जन्मोत्सव रंगीत विशेषांक !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ६ मार्च दिवशी दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !