‘उच्च कोटीच्या संतांनी हाताळलेल्या दैनंदिन उपयोगाच्या निर्जीव वस्तूही त्या संतांमधील सत्त्वगुणाने भारित होऊन पावन होतात. संतांनी हाताळलेल्या वस्तूंचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल. या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वत:च्या, अन्य संतांच्या आणि काही साधकांच्याही वापरातील वस्तूंची प्रभावळ आणि ऊर्जामापक यंत्राच्या साहाय्याने अभ्यास केला आहे. यातून त्यांच्यातील जिज्ञासूपणाचे दर्शन घडते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या मगामध्ये वैशिष्ट्यपूर्ण पालट झाल्याचे लक्षात आले. त्या संदर्भातील सूत्रे पुढे दिली आहेत.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या मगामध्ये वैशिष्ट्यपूर्ण पालट होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१६ पासून पुढे ४ वर्षे प्लास्टिकचा गुलाबी रंगाचा मग अंघोळीसाठी वापरला होता. त्यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या मगामध्ये वर्ष २०२० मध्ये वैशिष्ट्यपूर्ण पालट झाल्याचे लक्षात आले, उदा. मगाची वरील बाजूची गोलाकार कड फिकट गुलाबी रंगाची होणे, हाताला मगाचा स्पर्श मऊसर आणि गुळगुळीत लागणेे अन् मगातून विशिष्ट नाद ऐकू येणे इत्यादी.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या मगाची ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या मगाच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदीचे विवरण आणि निष्कर्ष पुढे दिले आहे.
२ अ. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवरण
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या मगामध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ दोन्ही प्रकाराच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.
२. सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या मगामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती आणि तिची प्रभावळ २२.५५ मीटर पेक्षाही अधिक होती.
३. वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ (ऑरा) मोजतात. सामान्य वस्तूची एकूण प्रभावळ अनुमाने १ मीटर असते. परात्पर गुरु डॉक्टरांनी अंघोळीसाठी वापरलेल्या मगाची एकूण प्रभावळ २२.५५ मीटर पेक्षाही अधिक होती.
टीप – चाचणीस्थळाची जागा अपुरी पडल्याने मगाच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि मगाची एकूण प्रभावळ २२.५५ मीटरच्या पुढे मोजता आल्या नाहीत.
२ आ. निष्कर्ष : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याच्या प्रभावाने त्यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या मगामध्ये पुष्कळ चैतन्य (सकारात्मक ऊर्जा) निर्माण झाले.
३. मगमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’ पदावरील संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. त्यांच्यातील चैतन्याचा परिणाम त्यांचा देह, त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, त्यांची खोली (निवासस्थान) आणि त्यांच्या खोलीतील वस्तू यांवर होतो. त्यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या मगाला त्यांचा चैतन्यमय हस्तस्पर्श झालेला असल्याने त्यामध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण झाले.
३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी अंघोळीसाठी वापरलेल्या मगामध्ये पंचतत्त्वांच्या स्तरावर झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र
३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी सुयोग्य पद्धतीने हाताळलेल्या मगाकडे पाहिल्यावर भावजागृती होणे आणि त्याला स्पर्श केल्यावर आनंदाची अन् प्रीतीची स्पंदने जाणवणे :
परात्पर गुरु डॉक्टरांनी अंघोळीसाठी वापरलेल्या मगाचे ‘हॅण्डल’ (मग ज्या ठिकाणी हातात पकडतो तो भाग) तुटले होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘फेव्हिकॉल’ लावून ते जोडण्यास सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा मगाचे हॅण्डल तुटले; त्या वेळी त्यांनी परत त्याला ‘फेव्हिकॉल’ लावण्यास सांगितले. पुढे काही दिवसांनी ‘फेव्हिकॉल’ लावूनही मगाचे हॅण्डल टिकत नाही’, असे लक्षात आल्यावर त्यांनी हॅण्डलला लोखंडी खिळे मारण्यास सांगितले. सर्वसाधारण व्यक्ती मगाचे हॅण्डल तुटल्यावर तो मग टाकून देऊन नवीन मग वापरण्यास घेते. याउलट ‘परात्पर गुरु डॉक्टर तुटलेली वस्तू दुरुस्त करून पुन्हा ती कशी वापरता येईल’, याचा विचार करून ती दुरुस्त करून वापरतात. यातून परात्पर गुरु डॉक्टरांमधील काटकसरीपणा हा गुण अनुभवण्यास मिळतो. त्यांनी सुयोग्य पद्धतीने हाताळलेल्या मगाकडे पाहिल्यावर भावजागृती होते आणि त्याला स्पर्श केल्यावर आनंदाची आणि प्रीतीची स्पंदने जाणवतात.
३ इ. संतांमधील निर्गुण चैतन्याच्या प्रभावाने त्यांच्या उपयोगातील वस्तूही निर्गुणाकडे जाण्यास आरंभ होणेे : यातून ‘संत जसजसे निर्गुणाकडे जातात, तसतसे त्यांनी उपयोगात आणलेल्या वस्तूही कशा निर्गुणाकडे जातात’ (उदा. मगाचा गुलाबी रंग फिकट होऊन पांढरट होणे), ते आम्हा साधकांना अनुभवायला मिळाले. ईश्वराने परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रत्यक्ष कृतीतून आणि त्यांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंच्या माध्यमातून आम्हाला हे शिकवले आणि जणू निर्गुणाचा एक अमूल्य ठेवाच आमच्या हाती दिला. ही इतिहासात नोंद करून ठेवण्यासारखी गोष्ट प्रथमच घडली.’
३ ई. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी अंघोळीसाठी वापरलेल्या मगातून सूक्ष्म नाद ऐकू येणे’, हे त्यांचे कार्य निर्गुण स्तरावर व्यापक होत असल्याचे निदर्शक असणे : परात्पर गुरु डॉक्टरांचे कार्य निर्गुण स्तरावर व्यापक होत आहे, तसा या मगावरही त्यांच्यातील निर्गुण चैतन्याचा परिणाम होऊन तोही निर्गुण स्तरावर, म्हणजे आकाशतत्त्वाच्या स्तरावर अधिक प्रमाणात कार्य करत असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यातून सूक्ष्म नाद अधिक प्रमाणात ऐकू येतो.
थोडक्यात, परात्पर गुरु डॉ. आठवले हे चैतन्याचे स्रोत आहेत. त्यांच्यातील चैतन्याचा पुष्कळ चांगला परिणाम त्यांच्या वापरातील वस्तूंवर होतो आणि तो टिकून रहातो. त्यामुळे ४ – ५ वर्षे मग न वापराताही त्यामध्ये ही स्पंदने टिकून आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रत्यक्ष स्पर्शाची स्पंदने ज्या गोष्टीत आहेत, ती प्रत्येक गोष्टच समष्टीच्या कल्याणार्थ चैतन्याच्या प्रक्षेपणाच्या स्तरावर अमूल्य ठरत आहे, हेच खरे !’
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.५.२०२०)
सूक्ष्मातील प्रयोग !
‘पुढील चित्राकडे १ – २ मिनिटे पाहून ‘मनाला काय जाणवते ?’, ते अनुभवण्याचा प्रयत्न करा.
सूक्ष्मातील प्रयोगाचे उत्तर
वरील छायाचित्रातील ‘मग’कडे पाहिल्यावर त्यातून भावाची स्पंदने जाणवतात, तसेच चैतन्यही प्रक्षेपित होत असल्याचे जाणवते. चित्राकडे एकटक पहात राहिल्यास शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती नेहमी एकत्र असते’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्यामुळे त्यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या मगामध्ये (‘मग’मध्ये) भावाची पुष्कळ स्पंदने निर्माण होत असल्याचे जाणवते.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते, याची चाचणी करतात. याला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग म्हणतात.