भाजप गाभा समितीच्या बैठकीत उमटले मराठी राजभाषा आंदोलनाचे पडसाद !

मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी निर्णायक लढा देण्याचा निर्धार ३१ मार्च या दिवशी ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’चे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखालील निर्धार मेळाव्यात करण्यात आला होता.

’’ढवळीकर बंधूंनी देहली येथे घेतली भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल्. संतोष यांची भेट

भाजप आणि मगोप यांच्यातील प्रदेशपातळीवरील वाद आता देहलीत पोचला आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी १ एप्रिल या दिवशी देहली येथे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी.एल्. संतोष यांची भेट घेऊन त्यांच्याशी भाजप आणि मगोप युतीविषयी चर्चा केली.

राज्यातील धरणांत मे अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा  ! – जलस्रोतमंत्री शिरोडकर

राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये पाण्याचा साठा निम्म्याहून अल्प झालेला आहे; मात्र जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या मते राज्यातील सर्व धरणांमध्ये मे मासाच्या अखेरपर्यंत पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे.

आमदार दिगंबर कामत यांच्या निर्दाेषत्वाला आव्हान देण्यासाठी पोलिसांना सरकारच्या संमतीची अपेक्षा

तत्कालीन काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री आणि खाण मंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी काडणेकर खाण आस्थापनाला खाणीच्या करारांचे नूतनीकरण विलंबाने करण्यास सवलत दिली होती.

सर्व ४० मतदारसंघांमध्ये मराठी मतपेढी निर्माण करणे अत्यावश्यक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

आम्ही राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांनी सामान्य मतदार म्हणून न रहाता आपली मतपेढी निर्माण केली पाहिजे. संख्याबळाचा वापर करावा लागेल. या अनुषंगाने पुढील ३ महिन्यांमध्ये तालुका स्तरावरील बैठका होणार आहेत.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या प्रसाराला आरंभ !

आश्रमाच्या प्रवेशद्वाराशी लावण्यात आलेल्या महोत्सवाच्या फलकाचे उद्घाटन ३० मार्च या दिवशी करण्यात आले. बांदिवडे गावाचे सरपंच श्री. रामचंद्र नाईक यांनी श्रीफळ वाढवून या फलकाचे उद्घाटन केले. तत्पूर्वी फलकाचे पूजन करण्यात आले.

गोव्यात गोमांसाची तस्करी चालूच !

येथील कोकण रेल्वे पोलिसांनी ३० मार्च या दिवशी सुमारे ३०० किलो अवैध गोमांस आणि मासळी भरलेले १० खोके कह्यात घेतले आहेत.

आज मराठी राजभाषा निर्धार मेळावा !

मराठीला गोव्यात राजभाषेचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी ३१ मार्च या दिवशी दुपारी ३.३० वाजता मिनेझिस ब्रागांझा सभागृह, पणजी येथे मराठी राजभाषा निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

‘गोल्डन ट्रायंगल अमली पदार्थ तस्करी’च्या प्रकरणी ३ जणांना पोलीस कोठडी 

गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ११ किलो ६७२ ग्रॅम (बाजार मूल्य ११ कोटी ६७ लाख रुपये) हायड्रोपोनिक वीड गांजा कह्यात घेतला होता.

आंतरराष्ट्रीय नोकरभरती घोटाळ्याचे जाळे उद्ध्वस्त

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने आंतरराष्ट्रीय नोकरभरती घोटाळ्याचे जाळे उद्ध्वस्त केले आहे.