पाटणे, काणकोण येथील समुद्रकिनार्यावरील ५२ अनधिकृत बांधकामे पाडली
यापुढे काणकोण नगरपालिकेने कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता अनधिकृत बांधकाम चालू होताच ते रोखावे; म्हणजे बांधकाम पाडण्यासाठीचा खर्च वाचेल !
यापुढे काणकोण नगरपालिकेने कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता अनधिकृत बांधकाम चालू होताच ते रोखावे; म्हणजे बांधकाम पाडण्यासाठीचा खर्च वाचेल !
अशा घटनांमुळे हिंदूंच्या सणांविषयी चुकीची प्रतिमा निर्माण होते आणि काही हिंदूच अन्य धर्मियांच्या प्रचाराला बळी पडून हिंदु धर्मापासून दूर जातात. त्यामुळे हिंदूंना आधी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !
नवयुवक हौशी मंडळाच्या वतीने नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मडगाव येथे श्रीकृष्णपूजन आणि नंतर मिरवणूक काढण्यात आली. यावर्षीचा ५३ वा श्रीकृष्ण पालखी उत्सव होता.
काणकोण तालुक्यात यासंबंधी बागायतदार बाजाराच्या दुकानावर, चावडी, चाररस्ता आदी ४ रहदारीच्या ठिकाणी लावण्यात आलेले ‘हलालमुक्त दिवाळी साजरी करूया’, हे फलक पाहून धर्माभिमान्यांनी समाधान व्यक्त करून प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
डॉ. प्रमोद सावंत हे तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता त्यांचा सत्कार झाल्यावर ते बोलत होते.
गोवा पोलिसांनी २९ ऑक्टोबर या दिवशी कामरखाजन, म्हापसा येथून गायीच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचे सुमारे १५ ते २० डबे कह्यात घेतले आहेत. पोलिसांनी या वेळी चाकू आणि इतर हत्यारेही कह्यात घेतली आहेत.
मडगाव कदंब बसस्थानकावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून २ पिशव्यांमध्ये भरून आणलेला ३८ सहस्र ४०० रुपये किमतीचा जवळजवळ १२ किलो खवा जप्त करण्यात आला आणि तो नष्ट करण्यात आला.
वर्षानुवर्षे दिवाळीच्या पूर्वसंध्येला निघणार्या नरकासुर प्रतिमांच्या मिरवणुकांमुळे होणार्या गोंगाटामुळे आणि सहन न होणार्या संगीतामुळे वृद्ध अन् रुग्ण व्यक्तींना त्रास होतो. यावर्षी तरी त्याला आळा बसावा, अशी मागणी अनेकांकडून होत आहे.
गोवा हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणे संबंधितांना सुलभ होते. या ठिकाणी ग्राहकसंख्याही अधिक असल्याने पैसेही चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे युवती याकडे आकर्षित होत असतात.
स्थानिकांचा विरोध असूनही हणजूण कोमुनिदादच्या २७ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत कोमुनिदाद भूमीत ३ मोठ्या ‘इव्हेंट’चे (कार्यकमांचे) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आली.