‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवण्यासाठी मासाभरातच पोलीस ‘ॲप’ ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोव्याबाहेरील लोक गोव्यात येऊन गुन्हेगारी करतात. नागरिक या ‘ॲप’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ तक्रार नोंदवू शकणार आहेत. तक्रारदाराला स्वत:च्या ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे. तक्रारीनंतर पोलीस त्यावर कारवाई करतील.

गोव्यात सरकारी नोकरीसाठी आता १ – २ वर्षांचा अनुभव असणे सक्तीचे ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

नोकरीसाठी मंत्री आणि आमदार यांच्या दारासमोर रांगा लावाव्या लागणार नाहीत, तर कर्मचारी नोकरभरती आयोगाच्या माध्यमातून नोकरी मिळणार !

गोवा : डाव्या विचारसरणीच्या वक्त्यांचा भरणा असलेला डी.डी. कोसंबी विचार महोत्सव विरोधामुळे स्थगित

सरकारच्या या निर्णयाविषयी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो म्हणाले, ‘‘हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे.’’ महोत्सव स्थगित ठेवल्याने ‘दक्षिणायन अभियान’ या डाव्या विचारसरणीच्या प्रागतिक विचारवंतांनी सरकारवर टीका केली आहे.

गोवा : अमली पदार्थ व्यावसायिक एडविन न्युनीस याचे देशभरात ५० सहस्र ग्राहक

एडविनच्या विरोधात गोवा पोलिसांनी कारवाई का केली नाही ? त्यामुळे ‘अमली पदार्थ व्यावसायिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या साटेलोटे असल्याने न्युनीस यांच्यासारख्या गुन्हेगारावर कारवाई होत नाही’, असे सर्वसामान्यांना वाटल्यास चुकीचे ठरणार नाही !

विदेशात नोकरीचे आमीष दाखवून फसवणार्‍या बनावट दलालांवर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

हे दलाल करत असलेली कृती ही मानवी तस्करीच असल्याने त्यांच्या विरोधात तस्करीच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी तस्करी विरोधी तिसऱ्या राज्यस्तरीय परिषदेत दिली.

गोव्यात वेश्याव्यवसायासाठी युवतींची सर्वाधिक तस्करी

गोव्यात वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत गोव्यात १६ टक्के विदेशी, तर उर्वरित ८४ टक्के भारतीय युवती यांची वेश्याव्यवसायासाठी तस्करी करण्यात आली. विदेशी युवतींमध्ये बांगलादेशी युवतींचे प्रमाण सर्वाधिक होते, तर हे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

रामराज्य दिग्विजय रथयात्रेचे गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत !

‘रामराज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे, देशाचे नाव ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असे करणे, देशात शिक्षणात ‘रामायणा’चा समावेश करणे, कालगणना ‘ख्रिस्तपूर्व’ (ए.सी.) आणि ‘ख्रिस्तानंतर’ (डी.सी.) याऐवजी प्रभु श्रीरामाच्या पूर्वी अन् प्रभु श्रीरामाच्या नंतर अशी करावी, असे संकल्प करून या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.’’

८ नोव्हेंबरला खग्रास चंद्रगहण

मंगळवार (८ नोव्हेंबर) या दिवशी भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्टे्रलिया, अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश आणि संपूर्ण दक्षिण अमेरिका येथे ग्रहण दिसणार आहे. भारतात कुठेही ग्रहणस्पर्श दिसणार नाही. हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे; म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल.

कारवार (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार नंदा आचारी (गुरुजी) संतपदी विराजमान !

अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असणारे, तसेच कर्नाटक सरकारचा ‘जकणाचार्य पुरस्कार’ प्राप्त करणारे कारवार येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी घोषित करण्यात आली.

किनार्‍यांवर अनधिकृत कृत्ये करणार्‍यांना कोठडीत टाकण्याचे पोलिसांना अधिकार ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

पर्यटन खात्याने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार फौजदारी दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत पोलीस अधिकारी नियमांचे उल्लंघन करणार्‍याला कोठडीत टाकू शकणार आहेत, अशी चेतावणी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.