विदेशात नोकरीचे आमीष दाखवून फसवणार्‍या बनावट दलालांवर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मानवी तस्करी विरोधी तिसऱ्या राज्यस्तरीय परिषदेत दीपप्रज्वलन करतांना मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी – विदेशात नोकरीचे आमीष दाखवून युवक आणि युवती यांची फसवणूक करणार्‍या बनावट दलालांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. हे दलाल करत असलेली कृती ही मानवी तस्करीच असल्याने त्यांच्या विरोधात तस्करीच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मानवी तस्करीविरोधी एका जागृती कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

 _________________________________

या वेळी पोलीस महासंचालक जसपाल सिंह, मानवी तस्करीच्या विरोधात कार्य करणार्‍या ‘अर्ज’ या संस्थेचे अरुण पांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.