८ नोव्हेंबरला खग्रास चंद्रगहण

गोवा, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – मंगळवार (८ नोव्हेंबर) या दिवशी भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्टे्रलिया, अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश आणि संपूर्ण दक्षिण अमेरिका येथे ग्रहण दिसणार आहे. भारतात कुठेही ग्रहणस्पर्श दिसणार नाही. हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे; म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल.

चंद्रग्रहणाच्या वेळा

१. स्पर्श (आरंभ) : ८.११.२०२२ या दिवशी दुपारी २.३९ वाजता
२. मध्य : दुपारी ४.३० वाजता
३. मोक्ष (ग्रहण समाप्ती) : सायंकाळी ६.१९ वाजता
(या वेळा मुंबई येथील आहेत.)

८ नोव्हेंबर या दिवशी सूर्योदयापासून ग्रहण मोक्षापर्यंत (सायंकाळी ६.१९ पर्यंत)

ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, रुग्णाईत व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांनी सकाळी ११ वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेेत.  (संदर्भ : दाते पंचांग)

याविषयीचा सविस्तर लेख ५ नोव्हेंबरच्या दैनिकात प्रकाशित करण्यात आला आहे. ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळाच्या पुढील मार्गिकेवर हा लेख वाचू शकता : bit.ly/3zMJUkS