आतापर्यंत ३१ जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न

राहुरी (जिल्हा अहिल्यानगर) – तालुक्यात रासायनिक दूध निर्माण करणार्या टोळीला राहुरी पोलिसांनी उघड केले आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार समीर शेख असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत या टोळीत ३१ जणांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. (नागरिकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळणार्या अशा दूध भेसळ करणार्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक) या प्रकरणी दूध संकलन केंद्रचालक रामदास उबाळे, मुख्य सूत्रधार समीर शेख, आफताब कलीम शेख यांना अटक केली आहे.
१. स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न अन् औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने १४ फेब्रुवारी या दिवशी जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे दूध भेसळीच्या विरोधात कारवाई केली.
२. त्यात ‘पॅराफिन’ (मिनरल ऑईल), ‘९.५’ नावाचे रासायनिक द्रव्य, दूध ‘क्रीम’ (साय) आणि पाणी यांचे यंत्राद्वारे मिश्रण करून क्रीम सिद्ध केले जात होते.
३. या १ लिटर ‘क्रीम’पासून २० लिटरपर्यंत बनावट दूध सिद्ध करून त्याची विक्री विविध भागांमध्ये केली जात होती.
४. सिद्ध केलेले क्रीम राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, जामखेड, श्रीगोंदा, बीड या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर विक्री केले जात होते. (बनावट दूध सिद्ध करणे, हा आरोग्याच्या दृष्टीने अतीसंवेदनशील विषय असल्याने सरकार याकडे गांभीर्याने पाहील का ? – संपादक)
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !