
(एफ्.डी.ए. – फूड अँड ड्रग्स अॅथॉरिटी – अन्न आणि औषधे प्रशासन)
(‘फास्ट फूड’ – अल्प कालावधीत बनवता येणारे खाद्यपदार्थ)
मडगाव, २० सप्टेंबर (वार्ता.) – अन्नसुरक्षा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी दक्षिण गोवा अन्न आणि औषधे प्रशासनाच्या पथकाने १९ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी मडगाव परिसरातील खारेबांध, आके, रावणफोंड जंक्शन, मडगाव रेल्वेस्थानक आणि मडगाव बसस्थानक या ठिकाणी जाऊन ‘फास्ट फूड’ची विक्री करणारे आणि उघड्यावर अन्नपदार्थ विकणारे यांची पहाणी केली. या वेळी ‘फास्ट फूड’ची विक्री करणारी ४ दुकाने तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. या दुकानांच्या संदर्भात अस्वच्छता, अनुज्ञप्ती नसणे, ‘सॅनिटरी कार्ड’चा अभाव, कर्मचारी योग्य पोशाखात नसणे आदी गोष्टी आढळून आल्या. या वेळी २२ दुकानांची पहाणी करण्यात आली. त्यांपैकी १३ दुकाने अनुज्ञप्ती न घेता चालवण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यांना प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आल्या. अस्वच्छता असल्याविषयी ७ दुकानांना मिळून एकूण २७ सहस्र रुपयांचा दंड आकारला गेला.
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !