उपवासाला भगर खातांना काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन !

भगर (प्रतीकात्मक छायाचित्र )

नांदेड – उपवासाला मोठ्या प्रमाणात भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात ‘अस्परजिलस’ प्रजातीच्या बुरशीचा संसर्ग होतो. अशा बुरशीचा संसर्ग झालेली भगर खाण्यात आल्यास अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खातांना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (बुरशीचा संसर्ग असलेली पाकिटे बाजारात येणार नाहीत, यासाठी प्रशासन काय प्रयत्न करणार, हे समजले पाहिजे ! – संपादक)

अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने भगर विक्री करणार्‍या दुकानांची पडताळणी करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या विक्रेत्यांवर ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

संपादकीय भूमिका 

प्रशासनाने उपवासाला भगर खातांना केवळ काळजी घेण्याचे आश्वासन करण्याऐवजी त्यामधील अडचणी सोडवणे अपेक्षित !