आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या माध्यमातून पूरग्रस्तांना साहाय्य !

पूरग्रस्तांना साहाय्य करतांना आमदार सुधीर गाडगीळ आणि कार्यकर्ते

सांगली, २५ जुलै (वार्ता.) – पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी पूर आलेल्या ठिकाणची प्रत्यक्ष पहाणी केली. पहाणी करतांना आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या माध्यमातून मगरमच्छ कॉलनी, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रस्ता येथील नागरिकांना त्यांचे साहित्य सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ट्रॅक्टर आणि टेंपो यांची सोय उपलब्ध करून दिली.

पूरग्रस्तांना साहाय्य करतांना आमदार सुधीर गाडगीळ (पांढरा मास्क) नगरसेवक लक्ष्मण नवलाई (गुलाबी सदरा)

अंकली, जुनी धामणी, हरिपूर येथील नागरिकांसाठी मालू हायस्कूल, विलिंग्डन कॉलेज याठिकाणी स्थलांतरीत करून ३०० हून अधिक पूरग्रस्तांसाठी भोजनाची सोय करण्यात आली आहे.

पूरग्रस्त भागात पहाणी करतांना आमदार सुधीर गाडगीळ
आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीने पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी सिद्ध करण्यात आलेला ट्रॅक्टर

या वेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, विश्‍वजीत पाटील, संघटन सरचिटणीस दीपक माने, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक युवराज बावडेकर, सुब्राव मद्रासी, लक्ष्मण नवलाई, युवा नेते पृथ्वीराज पवार, गौतम पवार, ओबीसी मोर्चाचे अमर पडळकर, चेतन माडगुळकर यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.