पिंपरी (पुणे) आणि आकुर्डी येथील साधन केंद्रातील पालकांच्या गृहभेटी घेण्याचे शिक्षकांना आदेश !

महापालिका शिक्षण विभागाने यू-ट्यूबच्या माध्यमातून पिंपरी आणि आकुर्डी शहर साधन केंद्रातील महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या मुख्याध्यापक अन् शिक्षक यांना शाळापूर्व सिद्धतेसाठी मार्गदर्शन केले.

इयत्ता १२ वीचा निकाल १० जून, तर इयत्ता १० वीचा २५ जूनपर्यंत !

इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षा यंदाच्या वर्षी रितसर झाल्या. इयत्ता १२ वीचा निकाल १० जून या दिवशी, तर इयत्ता १० वीचा निकाल २५ जूनपर्यंत लागेल.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत ३८ अनधिकृत शाळा !

इतक्या संख्येत अनधिकृत शाळा उभारल्या जाईपर्यंत शिक्षण विभाग काय करत होता ? विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणाऱ्या संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !

‘पालकांनी अभ्यासात लक्ष दे’ म्हटल्याचा राग आल्याने नववीतील मुलाची गळफास घेऊन आत्महत्या !

मानसिक दुर्बलतेने ग्रासलेल्या पिढीला संस्कारक्षम आणि सुदृढ बनवण्यासाठी धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे हेच यावरून लक्षात येते.

राज्यातील शाळेच्या बसगाड्यांना ‘जी.पी.आर्.एस्.’ प्रणाली बसवणे बंधनकारक !

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसगाड्यांमध्ये ‘जी.पी.आर्.एस्.’ बसवण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईतील पोदार शाळेतील बस सायंकाळी उशिरापर्यंत पोचली नव्हती.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे एकूण ३१ शाळा अवैध !

भ्रष्ट आणि लयाला गेलेली शिक्षणव्यवस्था हे लोकशाहीचे अपयश आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही !

संभाजीनगर महापालिका गरीब विद्यार्थ्यांसाठी चालू करणार ‘सी.बी.एस्.ई.’ शाळा !

महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा आणि इमारती आहेत तेथे ‘सी.बी.एस्.ई’चा अभ्यासक्रम चालू करण्यात येत आहे. सध्या आहे त्या शिक्षकांवर अभ्यासक्रमाचे दायित्व देण्यात आले असून नंतर शिक्षकांची भरती करण्याचा मानस आहे.’’

खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पुणे येथील ‘जोग एज्युकेशन ट्रस्ट’च्या अध्यक्षांसह चौघांवर गुन्हे नोंद !

भ्रष्ट कारभार करणारे अधिकारी विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ?

विद्यापिठात होणारे दीक्षांत सोहळे मराठमोळ्या पद्धतीने होणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री

इंग्रज गेले, आता आपण आपली प्रथा चालू करू. विद्यापिठात होणारे दीक्षांत सोहळे उत्साहाने भरलेले असायला हवेत. तरुणांच्या कलाने कार्यक्रम व्हायला हवा. तुमचा वेतन आयोग माझ्या दृष्टीने गौण आहे. विद्यार्थी महत्त्वाचा आहे. त्यांना काय हवे, याचा विचार होणार कि नाही

राज्यातील ६७४ अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश !

राज्यातील ६७४ शाळा अनधिकृत असल्याने त्या चालू राहिल्याने तेथील कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.