इयत्ता १२ वीचा निकाल १० जून, तर इयत्ता १० वीचा २५ जूनपर्यंत !

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे संकेत

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई – इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षा यंदाच्या वर्षी रितसर झाल्या. इयत्ता १२ वीचा निकाल १० जून या दिवशी, तर इयत्ता १० वीचा निकाल २५ जूनपर्यंत लागेल, असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १ जून या दिवशी येथे दिले आहेत.