पुणे येथे विविध गडकोटांवर दीपोत्‍सव साजरा !

सहस्रो दिवे लावून, पोवाडे, गोंधळ असा कार्यक्रम आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍याचे गुणगान करण्‍यात आले.

Narakasur-dahan Malpractice : गोव्यात नरकासुराच्या प्रतिमा जाळलेले अवशेष रस्त्यावरच !

नरकासुर प्रतिमा जाळल्यानंतर लोखंडी सांगाडा आणि खिळे रस्त्यावरच रहात असल्याने दक्षिण गोव्यातील अनेक वाहनचालकांना वाहने पंक्चर होण्याच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

पती-पत्नीमधील नात्‍याचा पाडवा !

हिंदु धर्मातील हे मूलतत्त्व जाणून आयुष्‍याची वाटचाल केली, तर या नात्‍यातील प्रेम, पावित्र्य, एकनिष्‍ठता टिकून राहील. या भक्‍कम नात्‍याच्‍या पायावरील इमारत पुढे आदर्श समाज आणि राष्‍ट्र यांची निर्मिती करील आणि तो खरा पाडवा होईल !

Diwali : बलीप्रतिपदा : विक्रम संवत्‍सराचा ‘वर्षारंभ दिन’ !

कार्तिक शुक्‍ल प्रतिपदा हा दिवस ‘बलीप्रतिपदा’ म्‍हणून ओळखला जातो. हा दिवस विक्रम संवत्‍सराचा ‘वर्षारंभ दिन’ मानला जातो. म्‍हणूनच या दिवसाला ‘दिवाळी पाडवा’ म्‍हणतात. व्‍यापारी लोक या दिवसापासून नवे ‘व्‍यापारी वर्ष’ चालू करतात.

Diwali : बलीप्रतिपदेच्‍या दिवशी दिले जाते दीप आणि वस्‍त्रे यांचे दान !

बलीप्रतिपदेच्‍या दिवशी भूमीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्‍याची पत्नी विंध्‍यावली यांची चित्रे काढून त्‍यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्‍यर्थ दीप आणि वस्‍त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्‍यंगस्नान केल्‍यावर स्‍त्रिया पतीला ओवाळतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात.

सातारा येथे फटाक्‍यांमुळे लागलेल्‍या आगीत चार भिंती परिसरातील वनसंपदा आगीच्‍या भक्ष्यस्‍थानी !

अजिंक्‍यतारा, चार भिंती आणि यवतेश्‍वर घाट परिसरात रात्रीच्‍या वेळी युवकांचा वावर असतो. अनेक जण व्‍यसन करण्‍यासाठी येतात. अशा व्‍यसनी युवकांवर सातारा पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सूज्ञ नागरिक करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे फटाक्‍यांमुळे आगीच्‍या १० घटना !

फटाके न उडवण्‍याविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयाचा आदेश असतांनाही फटाक्‍यांच्‍या उत्‍पादनावरच सरकार काही उपाययोजना का काढत नाही ?