शिवाला बेलाचे पान वहाण्याच्या पद्धतीमागील अध्यात्मशास्त्र

पिंडीत आहत (पिंडीवर पडणारे पाणी आपटल्याने निर्माण होणार्‍या) नादातील + अनाहत (सूक्ष्म) नादातील, अशी दोन प्रकारची पवित्रके असतात. ही दोन पवित्रके अधिक वाहिलेल्या बिल्वदलातील पवित्रके अशी तीन पवित्रके खेचून घेण्यासाठी तीन पाने असलेला बेल शिवाला वहावा.

Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शिवपिंडीला बेलपत्र कसे वहावे ?

बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही.

Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शिवपिंडीला प्रदक्षिणा कशी घालावी ?

शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.

Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शृंगदर्शन करण्याची शास्त्रोक्त पद्धत !

शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. शृंगदर्शनाविना शिवपिंडीचे दर्शन घेतल्याने होणारी हानी तसेच शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या व्हिडिओमध्ये दिले आहे.

विधवांनी हळदी-कुंकू का करू नये ?

पाश्चात्त्य विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन पुरो(अधो)गामी विचारसरणीच्या महिलांमध्ये अशा कृती करण्याची प्रथा पडत चालली आहे. महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतामध्ये असे होणे, हे दुर्दैवी आहे.

बनारस हिंदु विद्यापिठाच्या प्राध्यापकाकडून देवतांचा अवमान !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचाच हा परिणाम आहे ! असे प्राध्यापक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहेत ?

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील ‘श्री समर्थ कोचिंग सेंटर’मध्ये वसंतपंचमीच्या दिवशी करण्यात आले विद्यार्थ्यांचे प्रबोधन !

ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे वसंतपंचमीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्री समर्थ कोचिंग सेंटर’मध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

‘व्हॅलेंटाईन डे’ची कुप्रथा रोखण्यासाठी युवा पिढीला धर्मशिक्षण दिले पाहिजे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृतीच ! या पाश्चात्त्य ‘डे’मधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन मिळत असून काही धर्मांध संघटना जाणीवपूर्वक तो पसरवत आहेत.

हिंदूंनो, बुद्धीभेद करणार्‍या आणि हिंदु धर्मियांच्या श्रद्धांवर घाला घालणार्‍या पुरोगाम्यांचा कावा ओळखा !!

भिकार्‍यांना दिलेले पैसे कशा प्रकारे वापरले जातील, याची शाश्वती नसल्याने हिंदूंनो, ‘अपात्रे दान’ करून पापाचे भागीदार होऊ नका !

कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले येथील धर्मशिक्षणवर्गातील महिलांनी साजरी केली धर्मशास्त्रानुसार रथसप्तमी !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या सौ. विजया वेसणेकर यांनी पोर्ले येथील धर्मशिक्षणवर्गातील महिलांना धर्मशास्त्रदृष्ट्या रथसप्तमी कशी साजरी करायची ? याचे महत्त्व सांगितले. यानुसार तेथील महिलांनी रथसप्तमी साजरी केली.