दिनदर्शिकेवरील भगवान श्रीराम आणि सीतामाता यांच्या चित्रांवर स्वतःचा अन् पत्नीचा चेहरा लावला !
हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचाच हा परिणाम आहे ! असे प्राध्यापक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहेत ? – संपादक

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील बनारस हिंदु विद्यापिठाचे प्राध्यापक डॉ. अमरेश कुमार यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेतील भगवान श्रीराम आणि सीतामाता यांच्या यांच्या चित्रांवर स्वतःचा अन् स्वतःच्या पत्नीचा चेहरा लावला. या प्रकारामुळे त्यांना विरोध केला जात आहे.
(सौजन्य : News18 Virals)
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून; केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
या विभागात ५ फेब्रुवारीपासून चालू झालेल्या एका प्रदर्शनात कुमार यांनी ही दिनदर्शिका ठेवली आहे. कुमार यांच्या म्हणण्यानुसार, १० वर्षांपूर्वी देहली येथेही त्यांनी अशाच प्रकारच्या दिनदर्शिकेवर स्वतःचे आणि पत्नीचे छायाचित्र लावले होते. ‘ही श्रद्धेशी निगडित गोष्ट असून मी आणि माझे कुटुंब रामभक्त आहे’, असा दावा डॉ. कुमार यांनी केला आहे. (श्रद्धा कशाला म्हणतात ?, याचे हिंदूंना ज्ञान नसल्याने ते अशा प्रकारचे काहीतरी करून देवतांचा अवमानच करत आहेत ! – संपादक)
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !