शिवाला बेलाचे पान वहाण्याच्या पद्धतीमागील अध्यात्मशास्त्र

तारक किंवा मारक उपासना-पद्धतीनुसार बेल कसा वहावा ?

बेलाची पाने तारक शिवतत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचा देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे.

१. शिवाच्या तारक रूपाची उपासना करणारे

सर्वसामान्य उपासकांची प्रकृती तारक स्वरूपाची असल्याने शिवाची तारक उपासना ही त्यांच्या प्रकृतीला जुळणारी आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरणारी असते. अशांनी शिवाच्या तारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून बेलपत्र वहावे.

२. शिवाच्या मारक रूपाची उपासना करणारे

शाक्तपंथीय शिवाच्या मारक रूपाची उपासना करतात. अशा उपासकांनी शिवाच्या मारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी बेलाच्या पानाचे अग्र देवाकडे आणि देठ आपल्याकडे करून बेलपत्र वहावे.

पिंडीत आहत (पिंडीवर पडणारे पाणी आपटल्याने निर्माण होणार्‍या) नादातील + अनाहत (सूक्ष्म) नादातील, अशी दोन प्रकारची पवित्रके असतात. ही दोन पवित्रके अधिक वाहिलेल्या बिल्वदलातील पवित्रके अशी तीन पवित्रके खेचून घेण्यासाठी तीन पाने असलेला बेल शिवाला वहावा. वहातांना बिल्वपत्र पिंडीवर उपडे ठेवून देठ आपल्याकडे ठेवावा.

– सौ. प्रियांका गाडगीळ (पूर्वाश्रमीच्या कु. प्रियांका लोटलीकर), आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय