Video : महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या शृंगदर्शन करण्याची शास्त्रोक्त पद्धत !

शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलवणारे नसते, त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. शृंगदर्शनाविना शिवपिंडीचे दर्शन घेतल्याने होणारी हानी तसेच शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या व्हिडिओमध्ये दिले आहे.

वामहस्ती वृषण धरोनि ।
तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवोनि ।। – श्री गुरुचरित्र, अध्याय ४९, ओवी ४४

सविस्तर अर्थ : नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे.

पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेतांना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी अन् नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या शेजारी (बाजूला) उभे रहाणे

शिवाकडून येणार्‍या शक्‍त‍ीशाली सात्त्विक लहरी प्रथम नंदीकडे आकृष्ट होऊन नंतर नंदीकडून वातावरणात प्रक्षेपित होत असतात. नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे नंदीकडून या लहरी आवश्यकतेप्रमाणेच प्रक्षेपित होत असतात. त्यामुळे पिंडीचे दर्शन घेणार्‍याला प्रत्यक्षात शिवाकडून लहरी मिळत नाहीत; त्यामुळे त्याला शिवाकडून येणार्‍या शक्‍त‍ीशाली लहरींचा त्रास होत नाही. येथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवाकडून येणार्‍या लहरी सात्त्विकच असल्या, तरी सर्वसाधारण व्यक्‍त‍ीची आध्यात्मिक पातळी अधिक नसल्याने त्या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता तिच्यात नसते़ त्यामुळे त्या लहरींचा तिला त्रास होऊ शकतो. या कारणासाठीच सर्वसाधारण व्यक्‍त‍ीने पिंडीचे दर्शन घेतांना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी अन् नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या शेजारी उभे रहावे.

(वरील तत्त्वानुसार श्रीविष्णु इत्यादी देवतांच्या देवळांत देवतेची मूर्ती आणि तिच्यासमोर असणारी कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे राहून किंवा बसून देवतेचे दर्शन घेऊ नये. दर्शन घेऊ इच्छिणार्‍याने कासवाच्या प्रतिकृतीच्या शेजारी उभे राहून दर्शन घ्यावे.)

५० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या भक्‍त‍ात देवाकडून येणार्‍या सात्त्विक लहरी सहन करण्याची क्षमता असते आणि त्यामुळे त्या लहरींचा त्याला त्रास होत नाही. अशा भक्‍त‍ाने देवाचे दर्शन समोरूनच घ्यावे. यामुळे त्याला देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी सहजपणे ग्रहण करता येतात.

(सौजन्य : सनातन संस्था)

#MahaShivratri2022 #Mahashivratri #ShivShankar
#महाशिवरात्री
#shivaratri #shivratri #shivaratri2020 #haraharamahadev #lordshiva #omnamahshivaya #mahasivaratri #shivarathri #mahashivaratri
#Religion Spirituality

#Vaikuntha Ekadashi 2022 #Diwali 2021
#Maha shivratri 2022 #Bhakthi Divinity Zone