बाळगंगा प्रकल्पग्रस्तांवरील खटले मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरण संघर्ष, पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्तावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना सांगितले.

धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांना साहाय्य केल्याप्रकरणी नाशिकमधील पोलीस अधिकार्‍यांची होणार चौकशी !

अशा समाजद्रोही अधिकार्‍यांचे केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? स्थानांतरित ठिकाणीही हे पोलीस हेच गुन्हे करणार नाहीत का ? अशांचे त्वरित निलंबन करायला हवे ! तसेच त्यांचा कार्यकाळ का वाढवला गेला ?, याचीही चौकशी व्हायला पाहिजे !

कोकणात खनिजावर आधारित उद्योग चालू करण्याविषयी धोरण ठरवणार !

‘आतापर्यंत कोकणात जे प्रकल्प आले, ते रासायनिक आणि पर्यावरणाचा र्‍हास करणारे उद्योग आले. त्यामुळे अशा उद्योगांना येथे विरोध होतो; विदर्भाप्रमाणे कोकणात अनेक प्रकारची खनिजे आहेत. त्यामुळे यावर आधारित उद्योग कोकणात येतील का ?

नवीन लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने संमत !

केंद्रशासनाच्या लोकपाल कायद्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा करण्यासाठीचे लोकायुक्त विधेयक २८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. यापूर्वीच्या कायद्यामध्ये पालट करून नव्या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळाचाही समावेश कण्याची तरतूद असणार आहे.

सोलापूरमधील गोवंश हत्येविषयी होणार उच्चस्तरीय चौकशी !

‘सोलापूर एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या पशूवधगृहाने बांधकामाची अनुमती घेतली आहे का ? प्रदूषण नियंत्रणाविषयीचे नियम पाळले जात आहेत का ? तसेच गोवंशांची हत्या होत आहे का ? याविषयी उच्चस्तरीय चौकशी करून १ मासात अहवाल सादर केला जाईल.

विदेशातून चालणारा ऑनलाईन जुगार रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक पालट करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

भारतात चालत असलेल्या काही ऑनलाईन लॉटरीला अमेरिका, नेपाळ आदी देशांतून ‘होस्टिंग’ (ऑनलाईन नियंत्रण ठेवणे) केले जात आहे. विदेशातून नियंत्रित करण्यात येत असल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय दंड विधान, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा आणि लॉटरी प्रतिबंधक कायदा या कायद्यांद्वारे कारवाईला मर्यादा येत आहेत.

शिक्षक पात्र परीक्षा भरतीप्रक्रियेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची गृहमंत्र्यांची घोषणा !

अपात्र आस्थापनांना पात्र केले नसते, तर घोटाळा झाला नसता. या आस्थापनांना पात्र करण्याचा निर्णय कुणी दिला ? याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

यापुढे महिला आरक्षित जागेवर महिलांचीच नियुक्ती होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर फडणवीस यांनी वरील आश्वासन दिले. येत्या ३ मासांत याविषयीचा आदेश निर्गमित करण्यात येईल.

मुंबई येथील विधीमंडळाच्या सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार !

विधीमंडळाच्या सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यासाठी ऑगस्ट २०२२ या मध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांकडे निवेदन केले होते.

वीजमीटरचे चुकीचे रिडिंग देणार्‍या ७९ एजन्सींवर शासनाकडून कारवाई ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यात महावितरण आस्थापनाकडून अधिक वीजदेयके आकारण्यात येत असल्याचा सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर फडणवीस यांनी ही माहिती दिली.