मुंबई येथील विधीमंडळाच्या सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार !

नागपूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र मुंबईतील विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २७ डिसेंबर या दिवशी सभागृहात केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी २०२३ या दिवशी विधीमंडळामध्ये सायंकाळी ५ वाजता हा सोहळा होणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

विधीमंडळाच्या सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यासाठी ऑगस्ट २०२२ या मध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांकडे निवेदन केले होते.

या वेळी आमदार भास्कर जाधव यांनी या तैलचित्रामध्ये बाळासाहेबांच्या नावापुढे ‘शिवसेनाप्रमुख’ असा उल्लेख असेल का ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर ‘अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या कार्यक्रमाच्या वेळी पहाण्यात येईल’, असे उत्तर दिले.