तक्रार करणारी महिला आणि तिचा पती यांच्यावरच पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

सदर महिला आणि तिच कुटुंबीय यांना संरक्षण देऊन या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडतांना केली. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

प्रलोभने दाखवून परदेशात पाठवलेल्या बेरोजगार तरुणांना देशात परत आणले जाईल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

फसवणुकीद्वारे काही बेरोजगार तरुणांना परदेशात पाठवले असेल, तर त्यांना देशात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली.

नरेंद्र मोदी यांना घडवणार्‍या हिराबेनजीसारख्या मातांमुळे आपला देश महान ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सदैव प्रेरणास्रोत असलेल्या मातोश्री हिराबेनजी मोदी यांच्या निधनाने मोदीजींच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० डिसेंबर या दिवशी हिराबांना श्रद्धांजली वाहिली.

लिपिक पदासाठी मंत्रालयात अधिकार्‍यांच्या दालनात बोगस मुलाखती, चौकशीचा आदेश !

मुख्य प्रशासकीय केंद्राच्या ठिकाणी बोगस मुलाखती चालणे, ही सरकारची नाचक्की !

आटपाडी (जिल्हा सांगली) येथील धर्मांतराच्या प्रकाराचे सखोल अन्वेषण करून योग्य ती कार्यवाही होईल ! – गृहमंत्री

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केले आटपाडी (जिल्हा सांगली) येथील धर्मांतराचे सूत्र

ठाणे शहरात ‘हर्बल’च्या नावाखाली हुक्का पार्लरचा सुळसुळाट !

शहरात ‘हर्बल’च्या (वनौषधींच्या) नावाखाली हुक्का पार्लरचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. या अनधिकृत व्यवसायावर कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली.

मालाड येथील पोलीस हौसिंग फेडरेशनला दिलेला भूखंड परत घेणे विचाराधीन ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मालवणी येथील बेस्ट डेपोलगतचा भूखंड १९९९ मध्ये महाराष्ट्र पोलीस को-ऑप.हौसिंग फेडरेशनला दिला होता. ज्या कारणासाठी हा भूखंड दिला होता, तसा त्याचा उपयोग झाला नाही.

आटपाडी (जिल्हा सांगली) येथील धर्मांतराच्या प्रकाराचे सखोल अन्वेषण करून त्यावर योग्य ती कार्यवाही होईल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी गेळे हे अनेक वर्षे गरीब लोकांच्या अज्ञानाचा अपलाभ उठवत, तसेच आमीष दाखवून धर्मांतर घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रातील महिलांना न्याय देणारे सरकार ! – सौ. चित्रा वाघ, महिला प्रदेश मोर्चा प्रदेशाध्यक्ष, भाजप

मुंबई महानगरात गोवरविषयी जागृती प्रसारात आरोग्य सर्वेक्षणाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने ५ सहस्र ५०० आशा सेविकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

समृद्धी महामार्ग म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा यांच्या विकासाची जीवनवाहिनी ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या महामार्गामुळे येणार्‍या ४ वर्षांत  विदर्भाचे चित्र पालटणार आहे. या पुढील काळात नागपूर, वर्धा यांचा विकास झालेला दिसेल. संभाजीनगर-जालना यांचा विकास केवळ या रस्त्यामुळे होईल.