शिक्षक पात्र परीक्षा भरतीप्रक्रियेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची गृहमंत्र्यांची घोषणा !

नागपूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्र परीक्षेच्या भरती प्रक्रियेत अपात्र ठरवलेल्या आस्थापनांना पात्र करण्यात आल्यामुळेच हा घोटाळा झाला. हा घोटाळा मंत्रालयीन पातळीवर झाला आहे. तत्कालीन सरकारकडून हा घोटाळा झाला असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

माजी मंत्री आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांनी २८ डिसेंबर या दिवशी सभागृहात माहितीची सूचना (‘पॉईंट ऑफ इंफॉर्मेशन’) सभागृहात उपस्थित करून शिक्षक पात्र परीक्षेच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपात्र आस्थापनांना पात्र केले नसते, तर हा घोटाळा झाला नसता. या आस्थापनांना पात्र करण्याचा निर्णय कुणी दिला ? याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.