बिहारमधील प्रिया दास नावाच्या तरुणीने चुलीवर मनुस्मृति जाळून त्याद्वारे पेटवली सिगारेट !

मनुस्मृति जाळणे आता ‘फॅशन’ झाली आहे; मात्र अशा लोकांना ‘कोणतेही पुस्तक जाळल्याने त्यातील विचार नष्ट होत नाहीत’, हे कधी लक्षात येत नाही !

देहलीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ

देहलीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली.

सीमाप्रश्‍न लवकरात लवकर सोडवण्यासाठी एकत्रित काम केले पाहिजे ! – चीन

असे चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी बोलतांना म्हटले आहे.

रशियाकडून विशेष विशेषाधिकार प्राप्त, रणनीतीचा सहकारी दर्जा प्राप्त करणारा एकमेव देश भारत !

हा अधिकृत दर्जा आहे. मला नाही वाटत की, आम्ही असा अधिकृत दर्जा अन्य कुणाला दिलेला आहे, अशा शब्दांत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी भारताचे कौतुक केले !

खलिस्तानवादी अमृतपाल सिंह याच्यावर आक्रमण करून पंजाबमध्ये हिंसाचार घडवण्याचा अन्य खलिस्तान्यांचा कट !

अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या संदर्भात राज्य आणि केंद्र शासन यांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.

हिजाब घालून परीक्षा देण्याच्या याचिकेच्या सुनावणीसाठी ३ न्यायमूर्तींच्या पिठाची स्थापना होणार

कर्नाटकमधील सरकारी शाळांमध्ये हिजाब घालून परीक्षा देण्याची अनुमती मागणार्‍या मुसलमान विद्यार्थिनींच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय ३ न्यायमूर्तींच्या पिठाची स्थापना करणार आहे.

‘इस्लामिक स्टेट’च्या ७ आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.च्या) लक्ष्मणपुरी येथील  विशेष न्यायालयाने वर्ष २०१७ मध्ये रेल्वेगाडीतील बाँबस्फोटांच्या प्रकरणी इस्लामिक स्टेटशी संबंधित ७ आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा आणि त्यांच्या महंमद आतिफ उपाख्य ‘आतिफ इराकी’ या साथीदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

भारतात कार्य करणार्‍यांना कायद्यांचे पालन करावे लागेल ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

ज्यांना जी भाषा समजते, त्यांना त्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे, हेच आता भारत करू लागला आहे, हे चांगले लक्षण आहे !

‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ची विदेशातून दान घेण्याविषयीची अनुज्ञप्ती निलंबित !

नियमांचे पालन न केल्यावरून येथील ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’चे ‘फॉरेन काँट्रीब्यूशन रेगुलेशन ॲक्ट’ (एफ्.सी.आर्.ए.) अनुज्ञप्ती केंद्रशासनाकडून निलंबित करण्यात आली आहे. यामुळे आता या संस्थेला विदेशातून दान स्वीकारता येणार नाही.

घरगुती गॅस सिलिंडरच्या मूल्यात ५० रुपयांची वाढ !

घरगुती सिलिंडरच्या मूल्यामध्ये ५० रुपयांनी वाढ तर व्यावसायिक सिलिंडरच्या मूल्यामध्ये ३५० रुपये ५० पैशांनी वाढ !